वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा दालचिनीच्या पाण्याचे सेवन
दालचिनीच्या पाण्यात अटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते आणि आरोग्य सुधारते. शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. रक्तात वाढलेली साखर शरीरासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे रक्तात वाढलेली साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी नियमित दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे.
गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनीचे पाणी अतिशय प्रभावी ठरेल. दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून दुधाचा चहा पिण्याऐवजी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे.
दालचिनीचे पाणी बनवताना सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात दालचिनी पावडर किंवा दालचिनी टाकून व्यवस्थित उकळा. पाणी गाळून त्यात मध मिक्स करून नियमित सेवन करावे.