वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिकन खायला खूप आवडते. वजन कमी करताना चिकन सॅलड खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.
चिकन सॅलडमध्ये भरपूर प्रथिने असतात. तुमच्या शरीरात जर सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर चिकन सॅलड खावे. यामुळे शरीर सुधारण्यास मदत होते.
वजन कमी करताना आहारात नेहमीच चिकन सॅलड खाल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि वजन कमी होण्यास मदत होईल. पण दिवसभरातून एकदाच चिकन सॅलड खावे.
चिकन सॅलड तयार करताना त्यात कांदा, शिमला मिरची, काकडी, टोमॅटो, गाजर आणि लेट्यूसच्या पानांचा वापर करावा. लेट्यूसची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.
चिकन सॅलडमध्ये नियासिन, सेलेनियम, फॉस्फरस आणि विटामिन बी६, विटामिन सी, विटामिन ए, कॅल्शियम आणि लोह इत्यादी आवश्यक पोषक घटक आढळून येतात.