संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी आवर्जून करा 'या' पेयांचे सेवन
दिवसाची सुरुवात नारळ पाण्याने केल्यास कायमच तुम्ही फ्रेश राहाल. यामध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते.
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय वाढवण्यासाठी मदत करतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी प्यावा.
सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करण्याऐवजी हिरव्या भाज्यांच्या रसाने करावी. हिरव्या भाज्यांचा रस शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा कमी करतात.
कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही तर पोटासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे आयबीएस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड रस प्यावा.
हँगओव्हर किंवा डिहायड्रेशनची समस्या वाढू लागल्यास टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये ९५ टक्के पाणी असते. टोमॅटोचा रस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.