या 5 देशांमध्ये मुलींच्या जिवाला सर्वात जास्त धोका! चुकूनही यात्रा करू नका
अशा 5 देशांबद्दल जाणून घेऊया ज्या ठिकाणी महिलांनी प्रवास करणं धोकादायक मानलं जातं.
अफगाणिस्तान असा देश आहे जिथे महिलांसाठी प्रवास करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. तालिबानचे वर्चस्व असलेल्या या देशात सातत्याने दहशतवादी कारवाया होत असतात.
सीरिया असा देश आहे जिथे महिलांसाठी प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. सीरियात सुरू असलेल्या युद्धामुळे येथील वातावरण अत्यंत बिघडले आहे. या देशात महिलांसाठी किमान सुरक्षाही नाही.
पाकिस्तानमध्ये दररोज दहशतवाद आणि हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. महिलांनी येथे प्रवास करण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी आणि योग्य ड्रेस कोडचे पालन करावे.
सोमालियामध्ये महिलांसाठी प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. अल-शबाबसारखे दहशतवादी गट येथे सक्रिय आहेत. येथे हिंसाचार आणि लूटमार हे प्रकार सर्रास घडतात.
चालू असलेल्या संघर्ष आणि मानवतावादी संकटामुळे, येमेनमध्ये महिलांनी प्रवास करणं सुरक्षित नाही.