IND vs PAK Head to Head Record: आशिया कपला ९ सप्टेंबर २०२५ पासून (Asia Cup 2025) सुरुवात होणार असून, यंदाच्या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ओमान, हाँगकाँग आणि नेपाळ यांचा समावेश आहे. भारतीय संघ या स्पर्धेत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक रोमांचक सामने झाले आहेत. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण १८ सामने झाले आहेत. यापैकी भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला ६ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. २ सामन्यांचा निकाल लागला नाही.
वनडे आणि टी-२० रेकॉर्ड:
एकूणच, आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे.
या वर्षीच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सध्या भारतीय संघ खूप मजबूत स्थितीत दिसत आहे. याउलट, पाकिस्तानच्या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघ १३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात भारताने १० सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने ३ सामन्यांत विजय मिळवला आहे. आता आशिया कपमध्ये कोणाची सरशी होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, आणि रिंकू सिंग
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम.