सर्वच महिला आणि मुलींना ड्रेस घालायला खूप आवडतात. कोणत्याही कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात जाताना डकुर्ती किंवा पंजाबी ड्रेस घातला जातो. पण अनेकदा फॅब्रिक किंवा ड्रेस पीस आणल्यानंतर ड्रेसचा मागील गळा नेमका कसा शिवावा? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी वेगवेगळ्या वेबसाईट किंवा इतर ठिकाणांहून ड्रेसचे पार्टन शोधले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ड्रेसच्या मागील गळ्याच्या काही सुंदर आणि युनिक डिझाइन्स दाखवणार आहोत. या डिझाइन्स ट्रेडिशनल किंवा डेलीवेअर ड्रेसमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य-pinerest)
पंजाबी ड्रेस, कुर्ती डिझाइन्स

पाठीला डीप नेक आणि मागे नॉड्स शिवून तुम्ही या पद्धतीचा गळा शिवून घेऊ शकता. या पद्धतीच्या नॉड्स खूप सुंदर दिसतात.

कॉटनच्या ड्रेसला जर डिजायनर लूक द्याचा असेल तर तुम्ही या डिझाईनचा मागील गळा शिवून घेऊ शकता. अशा पद्धतीने ड्रेस शिवल्यास तुम्ही हा ड्रेस लग्न समारंभात सुद्धा परिधान करू शकता.

तुम्हाला जर मागील ड्रेसचा गळा खूप साधा पण लहान हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचा पॅटर्न शिवून घेऊ शकता.

तुमच्या साध्य सिंपल ड्रेसला जर तुम्हाला मॉर्डन टच द्याचा असेल तर तुम्ही या पद्धतीचा ड्रेस शिवून घेऊ शकता. यामुळे तुम्ही इतरांपेक्षा थोडे युनिक दिसाल.

काहींना मोठा गळा असलेले ड्रेस परिधान करायला खूप आवडतात. त्यामुळे तुमच्यासाठी ही डिझाईन अगदी उत्तम आहे.






