हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. या सणाला घरोघरी सुंदर रांगोळी, दिवे, फराळ इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. सणाच्या दिवशी घरातील महिला साडी परिधान करण्यास जास्त प्राधान्य देतात. पण नवीन साडी घेतल्यानंतर त्यावर कशा पद्धतीने ब्लाऊज शिवावा, याबद्दल अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होतात. आरी वर्क केलेले हेवी ब्लाऊज कायमच घातले जातात. पण घरात नेसल्या जाणाऱ्या साड्यांवर आरी वर्क केलेले ब्लाऊज शोभून दिसत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्लिव्हज पॅटर्न्सच्या ब्लाऊजचे काही आकर्षक डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे ब्लाऊज नक्की शिवून पहा. (फोटो सौजन्य: Pinterest)
दिवाळीनिमित्त साडीवर शिवा 'या' स्लिव्हज पॅटर्न्सचे आकर्षक ब्लाऊज
दिवाळीसाठी परफेक्ट स्टनिंग लुक हवा असेल तर तुम्ही या पॅटर्न्सचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. ब्लाऊजच्या हातांना छोट्या छोट्या प्लेट्स काढून मध्यभागी डायमंड किंवा मणी लावल्यास ब्लाऊजची शोभा वाढेल.
ब्लाऊजच्या हातांना तुम्ही बारीक बारीक मणी किंवा कापडापासून लावून बनवलेले छोटे छोटे गोळे सुद्धा शिवून घेऊ शकता. बारीक मण्यांमुळे ब्लाऊजची शोभा वाढेल.
ब्लाऊजच्या स्लिव्हला नेट आणि छोट्या आकाराचे डायमंड लावून घेतल्यास डिझायनर ब्लाऊज तयार होईल. बारीक टाकल्यामुळे ब्लाऊजला रिच लुक येतो.
कोल्ड शोल्डर किंवा मध्येच कट आऊटचे स्लिव्हज पॅटर्न ब्लाऊज सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहेत. कोणत्याही साडीवर कोल्ड शोल्डर ब्लाऊज अतिशय उठावदार दिसतात.
कामाच्या धावपळीमध्ये ब्लाऊजची डिझाईन शोधायला जास्तीचा वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही साध्या पद्धतीने आकर्षक ब्लाऊज शिवून घेऊ शकता.