पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर पाकिस्तानने केलेले प्रत्येक भ्याड हल्ले भारतीय सेनेने परतवून लावले. तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी करुन जगामध्ये भारताची ताकद दाखवून दिली. तसेच पाकिस्तानची तीन रात्र झोप उडवली. सैन्याच्या या शौर्याचे कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारत शौर्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.
UP CM Yogi Adityanath organized a Bharat Shaurya Tiranga rally for Operation Sindoor success
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे आयोजित करण्यात आलेल्या या भारत शौर्य तिंरगा रॅलीमध्ये यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आला.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'तिरंगा रॅली' काढली.
सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये लाखो लोक सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये जवानांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरुणांची संख्या लक्षणीय होती. तसेच वयोवृद्ध लोक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे परिसरामध्ये उत्साहपूर्ण आणि शौर्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो कोणी भारताकडे बोट दाखवेल आणि आपल्या बहिणी आणि मुलींच्या सुरक्षेला आणि त्यांच्या सन्मानाला धक्का देण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या अंत्यसंस्कारात कोणीही रडणार नाही, असा सज्जड इशारा दिला.