BSNL Recharge Plan: कंपनीचा 1 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु! अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळणार हे फायदे... जाणून घ्या
7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
बीएसएनएलने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलद्वारे एका नवीन १ रुपयाच्या प्लॅनची घोषणा केली आहे. या ‘फ्रीडम ऑफर’ अंतर्गत, कंपनी नवीन बीएसएनएल सिम खरेदी करणाऱ्यांना २४ दिवसांची वैधता देत आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा, १०० मोफत एसएमएसचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
गेल्या वर्षी, कंपनीच्या १ रुपयाच्या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळत होता. याशिवाय, प्लानची वैधता २८ दिवसांची होती. यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळत होते.
This Independence Day, why not start something better? Your first step towards a better connection is here.#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #IndependenceOffer #FRC1 @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/HObE4inHxD — BSNL India (@BSNLCorporate) August 12, 2026
गेल्या वर्षी सुरू केलेला ‘फ्रीडम प्लॅन’ बंद केल्यानंतर, कंपनीने १ रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला होता, नवीन बीएसएनएल सिम खरेदीवर २८ दिवसांची वैधता देणारा ५१ चा प्लॅन असून या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखे फायदेही मिळत होते.
या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीने आपल्या लाखो यूजर्ससाठी आणखी एक फ्रीडम ऑफर जाहीर केली आहे, ज्यामध्ये २३९९ रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर ४७ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. आता यूजर्सना एकूण ४१२ दिवसांची वैधता मिळेल. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये मिळणारे सर्व फायदे ४१२ दिवसांसाठी वैध आहेत, या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा आणि १०० मोफत एसएमएस मिळतात. याशिवाय, तुम्हाला संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत नॅशनल रोमिंग देखील मिळते.

