यंदाच्या वर्षी २९ जूनला वटपौर्णिमा सण आहे. हिंदू धर्मात येणाऱ्या सर्वच सणांना विशेष महत्व आहे. यादिवशी सर्व महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला हे व्रत करतात. सर्वच विवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा सण खूप खास असतो. त्यामुळे यंदाच्या पहिल्या वटपौर्णिमेला कोणत्या रंगची साडी नेसावी सुचत नसेल तर हे आकर्षक रंग नक्कीच ट्राय करा. या रंगांच्या साड्या नेसून तुम्ही पारंपरिक आणि स्टायलिश लुक करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
Vat Purnima 2026: वटपौर्णिमा सणाला नेसा ‘या’ आकर्षक रंगांच्या साड्या! सौभाग्याच्या सणासाठी परफेक्ट लुक

लाल रंग सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे वटपौर्णिमा सणाला तुम्ही लाल रंगाची माहेश्वरी, पैठणी, बनारसी सिल्क किंवा काठपदर साडी नेसून सुंदर लुक करू शकता.

हिरवा रंग निर्सगाशी जोडलेला आहे. समृद्धीचे प्रतीक म्हणून सणावारांच्या दिवशी हिरव्या रंगची साडी नेसली जाते. हिरव्या लाल किंवा डार्क हिरव्या रंगचीपैठणी नसून पारंपरिक लुक करू शकता.

पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. पिवळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि मोत्याचे किंवा सोन्याचे सुंदर दागिने परिधान करू शकता.

नात्यांमधील गोडवा, प्रेम आणि आदर वाढवण्यासाठी नवविवाहित स्त्रिया सणावारांच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी परिधान करतात. लाईट गुलाबी रंगाच्या साडीवर हिरवे किंवा लाल ब्लाऊज सुंदर दिसेल.

अनेकांना डार्क आणि रॉयल लुक देणाऱ्या साड्या नेसायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही निळ्या आणि लाल काठ असलेल्या साडीची निवड वटपौर्णिमा सणासाठी करू शकता.






