धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शारिरीक आरोग्य बिघाडून जाते. शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निमार्ण झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर किंवा कामात लक्ष न लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे हात-पायांना मुंग्या येणे, सुन्नपणा, स्नायूंची कमजोरी, हाडांमध्ये वेदना होतात. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचा आवर्जून समावेश करावा. आहारात केलेल्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा सांगाडा झाला आहे? मग नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन

माशांमध्ये प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, विटामिन सी चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे सेलेनियम आणि आयर्न यासारख्या पोषक घटक असलेल्या माशांचे सेवन करावे.

दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग म्हणजे दुग्धजन्य पदार्थ. विटामिन बी १२ ची कमतरता भरुन काढण्यासाठी नियमित वाटीभर दही खावे.

नियमित एक ग्लासभर दूध प्यावे. दुधात कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन डी, आणि मॅग्नेशियमसारखे अनेक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दुधातील उच्च दर्जाचे प्रोटीन्स स्नायूंची वाढ करण्यास मदत करतात.

विटामिन बी १२ ची पातळी भरुन काढण्यासाठी मशरूम खावेत. मशरूमचे सूप, स्टर-फ्राय किंवा भाजीच्या स्वरूपात सेवन केल्यास ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते.

अंड्याच्या आतील पांढऱ्या भागात प्रोटीन भरपूर असते. त्यामुळे एक किंवा दोन उकडलेली अंडी खावीत. यामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भरुन निघण्यास मदत होईल.






