सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा गेल्या काही महिन्यांपासून कामानिमित्त अमळनेर येथे वास्तव्यास होता आणि अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तो बोरनार येथील आपल्या गावी परतला होता. बुधवारी रात्री तो गावातील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. लग्नाच्या धामधुमीतच त्याचा काही तरुणांशी वाद झाला. त्यानंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने प्रेमला घेरून बेदम मारहाण केली. या झटापटीत टोळक्यातील एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा वार केला. या हल्ल्यात प्रेम गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
भर लग्नात घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेमागे गैरसमजाचे कारण पुढे येत आहे. लग्नसमारंभात प्रेमचा दुसऱ्या एका तरुणाशी वाद सुरू होता. मात्र, हल्लेखोरांनी प्रेम आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून घेतला आणि त्यातूनच चिडून त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा जीव घेतला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ल्यात सहभागी असलेल्या उर्वरित सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीवर नातेवाईक ठाम राहिल्याने रुग्णालयात मोठी गर्दी जमली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतरही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्याबाबत काय निर्णय घेतात आणि पोलीस उर्वरित आरोपींच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: बुधवारी रात्री गावातील लग्नसमारंभात झालेल्या वादानंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने प्रेम गोपाल धनगर याला घेरून मारहाण केली आणि धारदार शस्त्राने जीवघेणा वार करून त्याची हत्या केली.
Ans: लग्नात दुसऱ्या तरुणाशी वाद सुरू असताना प्रेम आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज हल्लेखोरांनी करून घेतल्यामुळे हा हल्ला झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Ans: पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे; मात्र हल्ल्यातील उर्वरित सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर नातेवाईक ठाम असल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव आहे.






