श्रावणातील सणाच्या दिवशी गळ्यात घाला 'या' सुंदर डिझाइन्सचे मंगळसूत्र
साऊथ इंडियन डिझाईनचे मंगळसूत्र कोणत्याही साडी किंवा ड्रेसवर सुंदर दिसते. हे मंगळसूत्र काळे मणी आणि लक्ष्मीचे पेंडेंट वापरून तयार केले जाते.
सर्वच महिलांना वाटी मंगळसूत्र परिधान करायला खूप जास्त आवडते. त्यामुळे तुम्ही काळे मणी आणि नाजूक साजूक वाट्यांचे सुंदर मंगळसूत्र खरेदी करू शकता.
या डिझाईनचे मंगळसूत्र गळ्यात घातल्यानंतर इतर कोणताही दागिना परिधान करण्याची अजिबात आवश्यकता भासणार नाही. कारण भरीव नक्षीकाम करून तयार केलेले मंगळसूत्र गळ्यात अतिशय सुंदर दिसते.
काळे मणी आणि सोनेरी मणी एकमेकांमध्ये गुंफून तयार केलेल्या मंगळसुत्रचा सोशल मीडियावर मोठा ट्रेंड आहे. वजनाने कमी पण आकाराने मोठे असलेले मंगळसूत्र हल्ली सर्वच महिलांच्या गळ्यात दिसून येतात.
पैठणी किंवा सिल्वर बॉर्डर असलेली काठपदर साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही काळे मणी आणि डायमंडच्या वाट्यांचे कॉम्बिनेशन असलेले मंगळसूत्र परिधान करू शकता.