Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

महाराष्ट्र सरकारने 2025 चे नवीन रत्ने आणि दागिने धोरण जाहीर केले असून यामध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा उद्देश असून यामुळे तब्बल 5 लाख नागरिकांना रोजगार मिळू शकतो. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 18, 2025 | 01:37 PM
महाराष्ट्र सरकारचे रत्ने आणि दागिने धोरण २०२५

महाराष्ट्र सरकारचे रत्ने आणि दागिने धोरण २०२५

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राचे रत्ने-दागिने धोरण 2025 जाहीर
  • 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट
  • 5 लाख नवीन नोकऱ्यांची मेगा अ‍ॅनाऊन्समेंट
 

Maharashtra Industrial Investment News: महाराष्ट्र सरकारने 2025 चे नवीन रत्ने आणि दागिने धोरण जाहीर केले असून यामध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा उद्देश असून यामुळे तब्बल 5 लाख नागरिकांना रोजगार मिळू शकतो. ज्वेलरी उद्योगात ही क्रांती मानली जात असून जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब मुंबईत उभारणार आहे. रत्ने-दागिने धोरण 2025 धोरण नेमकं काय आहे जाणून घेऊया सविस्तर..

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या GR च्या धोरणात २०२५-३० दरम्यान तब्बल १,६५१ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन पुढील २० वर्षांसाठी अंदाजे २०३१-२०५० पर्यंत अतिरिक्त १२,१८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येऊ शकते. त्यानुसार या धोरणात एकूण १३,८३५ कोटी रुपयांचा जवळपास खर्च येऊ शकतो.

हेही वाचा : Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात

हे धोरण पाच वर्षांसाठी किंवा नवीन धोरण लागू होईपर्यंत प्रभावी असल्याचे जीआरमध्ये म्हंटले आहे. सरकारने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अर्थसंकल्पीय शीर्षकाअंतर्गत १०० कोटी रुपये त्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद केली आहे. महाराष्ट्राच्या रत्ने आणि दागिने क्षेत्राचा भारताच्या एकूण आर्थिक उत्पादनात १८ टक्के वाटा आहे. ज्यामुळे महाराष्ट्र देशातील रत्ने आणि दागिने या क्षेत्रासाठी एक अग्रगण्य केंद्र आहे.  या क्षेत्रातील राज्याची निर्यात दुप्पट करणे आणि आर्थिक प्रोत्साहन करणे हा या धोरणाचे उद्दिष्ट आहे. तसेच, औपचारिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करत अनौपचारिक व्यवसायांना औपचारिक उद्योगांमध्ये रूपांतरित करणे आहे. हा मुख्य हेतु आहे.

प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारने नवी मुंबईच्या महापे औद्योगिक क्षेत्रात इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई या २१ एकरांवर पसरलेल्या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पातून अंदाजे ₹५०,००० कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल आणि १००,००० हून अधिक रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. २० एकरांवर पसरलेले जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र, मुंबईतील भारत डायमंड बोर्स सध्या अंदाजे ६०,००० लोकांना रोजगार देते. या धोरणात डिझाइन स्टुडिओ, प्लग-अँड-प्ले सुविधा आणि डिजिटल ट्रेडिंग सेंटर्स स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी आणि इतर संस्थांसोबत भागीदारीत कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाईल.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोनं चमकतंय पण चांदी उतरतेय… किंमतीचा अनोखा खेळ सुरूच, खरेदीदारांची चिंता वाढली

विशेष तरतुदींमध्ये मुद्रांक शुल्क सूट, उद्यानांमध्ये असलेल्या युनिट्ससाठी १० वर्षांसाठी वीज शुल्क सूट आणि १०० टक्के निर्यात-केंद्रित युनिट्स आणि तीन वर्षांसाठी प्रति युनिट एक ते दोन रुपये वीज शुल्क अनुदान यांचा समावेश असल्याचा उल्लेख जी आर मध्ये करण्यात आला आहे. सरकार इंडिया वेब ३ असोसिएशन आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्या भागीदारीत  मूल्य साखळीमध्ये पारदर्शकता आणि ट्रेसेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन-आधारित उद्योग खाते प्रणाली स्थापित करण्यात येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रत्ने-दागिने धोरण 2025 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

    Ans: महाराष्ट्र राज्यातील रत्ने-दागिने उद्योगाची निर्यात दुप्पट करणे, गुंतवणूक वाढवणे, अनौपचारिक व्यवसायांना औपचारिक क्षेत्रात आणणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे रत्ने-दागिने धोरण 2025 चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • Que: या धोरणांतर्गत किती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते?

    Ans: या धोरणांतर्गत सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक होऊन पुढील वर्षांत अंदाजे पाच लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • Que: ज्वेलरी हबमध्ये कोणते मोठे उपक्रम समाविष्ट आहेत?

    Ans: नवी मुंबईतील इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबईतील मोठे हिरे व्यापार केंद्र, डिझाइन स्टुडिओ, प्लग-अँड-प्ले सुविधा आणि डिजिटल ट्रेडिंग सेंटर्स उभारणी अशा प्रकारचे उपक्रम समाविष्ट आहेत

Web Title: The worlds largest jewelry hub will be set up in mumbai what is the gems and jewelry policy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • CM Devendra Fadanvis
  • Gold
  • Gold Jewellery
  • maharashtra
  • Maharashtra Cabinet Decision
  • Mumbai

संबंधित बातम्या

तुमचे सोन्याने दागिने खोटे तर नाहीत? 2 मिनिटांत सत्य होईल उघड; ही आहे प्रोसेस
1

तुमचे सोन्याने दागिने खोटे तर नाहीत? 2 मिनिटांत सत्य होईल उघड; ही आहे प्रोसेस

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश
2

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत
3

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
4

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.