(फोटो सौजन्य: Pinterest)
कुरकुरे म्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण… आपल्याला हवी असलेली गोष्ट त्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते हट्ट करत राहतात अथवा त्याची तक्रार मोठ्या वृद्धांकडे करु लागतात. पण मध्य प्रदेशातील एका चिमुकल्याने मात्र यात हद्दच पार केली. आठ वर्षांच्या मुलाने थेट पोलिसांनी फोन करुन आपल्या आईचीच तक्रार केली, ज्यानंतर पोलिस लगेचेच मुलाच्या घरी पोहचले. चला घटनेत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
काय आहे प्रकरण?
सदर घटना मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात घडलेली आहे. पोलिसांना एका आठ वर्षांच्या मुलाचा फोन आला आणि त्याने फोनवरच आपल्या आईची आणि बहिणीची तक्रार करण्यास सुरुवात केली. व्हिडिओत चिमुकल्याने त्याला त्याच्या आईने आणि बहिणीने खूप मारल्याची तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा त्याला यामागचे कारण सांगितले तेव्हा त्याने सांगितले की, त्याने कुरकुरे खाण्यासाठी २० रुपये मागितले पण पैसे न देता दोरीनं बांधून आईने आणि बहिणीने त्याला मारलं. अशात चिमुकल्याने रडत रडतंच ११२ हेल्पलाईन नंबरवर फोन केला आणि पोलिसांना आपली व्यथा सांगू लागला.
मग काय पोलिसही मुलाच्या घरी पोहचले आणि त्यांनी मुलाची आणि आईची समजूत काढली आणि मुलाला स्वत:च्या हाताने कुरकुरेचे पॅकेट भेट केले. पोलीस गस्ती पथकाच्या गाडीत बसून चिमुकयासोबत संवाद साधत असल्याचे दिसते. या मजेदार मजेदार घटनेचा व्हिडिओ मात्र आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलाच्या खोडसरपणाचे आणि पोलिसांचा समंजसपणाचे व्हिडिओत सार्थ दर्शन घडते.
#सोनभद्र सिंगरौली पुलिस को बच्चे ने फोन करके बताया कि कुरकुरे मांगने पर मां ने उसे पीट दिया है। इसपर पुलिस ने ध्यान से बच्चे की बात सुनी और उसके घर जाकर कुरकुरे और चिप्स का तोहफा दिया। pic.twitter.com/SXlP1ogplE — Abhishek sharma (@officeofabhi) October 4, 2025
या घटनेचा व्हिडिओ @officeofabhi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पोलिसांनी परीस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलगा जास्तच शहाणा निघाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.