ताज्या फळांचा रस पिण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्यास शरीराला होणारे फायदे
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित फळांचा रस प्यावा. पण कोणत्याही फळांचा रस प्यायल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी शरीराचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. फळांच्या रसात असलेले गुणकारी घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
डॉक्टरांच्या मते, फळांचा रस पिण्याची योग्य वेळ ठरलेली असते. सकाळच्या वेळी फळांचा रस पिणे शरीरासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. रात्रभराच्या झोपेनंतर शरीराला उर्जे मिळते.
सकाळी उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्यास शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स होते. वर्कआउट किंवा व्यायामाच्या अर्ध्या तासाने फळांचा रस प्यावा.
सकाळी फळांचा रस प्यायल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राहते. पण रात्री झोपण्याआधी चुकूनही फळांचा रस पिऊ नये. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.
रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जेवणासोबत फळांचा रस अजिबात पिऊ नये. यामुळे पचनक्रियेत अनेक अडथळे निर्माण होतात आणि आरोग्य बिघडून जाते.