आपल्या दणदणीत अभिनयाने वर्षा उसगावकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही अनेक प्रेक्षक त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. वर्षां यांनी मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही काम केले. त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात मात्र त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच झालं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? पहा फोटोज
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना आज कोणी ओळखत नाही. 90 च्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत
सध्या वर्षा उसगावकर यांनी बिग बाॅस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. या पर्वात त्यांना प्रेक्षकांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत असल्याचे दिसत आहे
आपल्या अप्रतीम सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या वर्षा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘ब्रह्मचारी’ नाटकातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
मराठीत ‘गंमत- जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तसेच ‘परवाने’, ‘तिरंगा’, ‘हस्ती’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांंनी काम केले आहे.
वर्षा सोशल मीडियावर बऱ्याच सक्रीय आहेत मात्र तरीही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वर्षा उसगावकर यांचे अरेंज मॅरेज झाले आहे
वर्षा उसगावकर यांच्या पतीचे नाव जय शंकर शर्मा असे आहे. ते कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. वर्षा आणि अजय यांचे 2000 साली गोव्यात लग्न झाले
वर्षा यांचे पती प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. ते अनेकदा वर्षा यांच्यासोबत इव्हेंट्समध्ये दिसले आहेत