ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कायमच हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात?
ऑपरेशन थिएटरमध्ये घातल्या जाणाऱ्या हिरव्या आणि निळ्या रंगच्या कपड्यांमागे काही वैद्यकीय कारणे आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि नर्स हिरव्या रंगाचे कपडे घालतात.
२० शतकापर्यंत पांढरा रंग हा स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतिक मानला जायचा. त्यामुळे सर्व डॉक्टर ऑपरेशन करताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे.
1914 सालानंतर ऑपरेशन करताना पांढऱ्या कपड्यांवर रक्त लागते, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे हळूहळू ऑपरेशन थिएटरमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे बंद झाले.
कपड्यांवर सडलेल्या लाल रंगाच्या रक्ताकडे सतत पाहिल्यानंतर मानवी डोळ्यांना कलर फटीगचा त्रास सुरु होतो. ऑपरेशन करताना रुग्णांच्या शरीरातून सतत रक्त वाहते. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याऐवजी हिरव्या किंवा निळ्या रंगचे कपडे परिधान केले जायचे.
हिरवा आणि निळा रंग केवळ डोळ्यांचं नाहीतर मेंदूला सुद्धा शांत ठेवतो. हे दोन्ही रंग तणाव कमी करण्यास मदत करतात. ऑपरेशन शांतपणे पार पडण्यासाठी डॉक्टर आणि नर्स हिरव्या रंगचे कपडे घालतात.