Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे

केरळमध्ये एकूण २७१४२९५२ मतदार असून, त्यापैकी ७९.६३ टक्के मतदारांनी १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केले. राज्यातील १४० जागांसाठी एकूण ८८३ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2026 | 08:14 AM
Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे

Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे

Follow Us
Follow Us:

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी, विरोधी संयुक्त लोकशाही आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात झालेल्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले स्थान मजबूत करू पाहणाऱ्या या तीनही आघाड्यांसाठी हे निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत.

केरळमध्ये एकूण २७१४२९५२ मतदार असून, त्यापैकी ७९.६३ टक्के मतदारांनी १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केले. राज्यातील १४० जागांसाठी एकूण ८८३ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले की, मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ४३ ठिकाणी १४० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी १५,४६४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यात १४० निवडणूक अधिकारी, १,३४० अतिरिक्त निवडणूक अधिकारी, ४,२०८ सूक्ष्म निरीक्षक, ४,२०८ मतमोजणी पर्यवेक्षक आणि ५,५६३ मतमोजणी सहाय्यकांचा समावेश आहे.

West Bengal Exit Poll 2026 : निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबईचे सट्टा बाजार गरम! बंगालमध्ये भाजप १७५ पार, तर तामिळनाडूत…

या प्रक्रियेचा भाग म्हणून, निवडणूक आयोगाचे निरीक्षक, सुरक्षा कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉग रूम उघडण्यात येईल. एकूण मतांपैकी १.३६ टक्के असलेल्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी प्रथम केली जाईल. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, मतमोजणी केंद्रांच्या संरक्षणासाठी राज्य पोलिसांच्या जवानांसोबत केंद्रीय दलाच्या २५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोणताही हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात पाळत वाढवली आहे.

केरळसह पाच राज्यांचे निकाल आज

दुसरीकडे, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेसाठी मतदान घेतले गेले होते. आता या निवडणुकीचे निकाल आज समोर येणार आहेत. हे निकाल देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार बनले, तर विरोधक पुन्हा एकदा ‘भाजपमुक्त’ महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करू शकतात.

राहुल गांधी यांचं महत्त्वपूर्ण विधान

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधीच ‘१६’ या आकड्याचा उल्लेख केला आहे. त्यांचा हा इशारा टीडीपी खासदारांच्या संख्येबाबत होता. त्यांनी यावर कोणतीही स्पष्टता दिली नसली, तरी त्यांनी आपले म्हणणे मांडले असल्याचे सांगितले आहे. याचा उलगडा येणाऱ्या काळात होऊ शकतो.

Web Title: A three way contest unfolded in kerala now people waiting of results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 08:14 AM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
1

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
2

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
3

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली
4

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली विधानसभेत कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.