Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?

अभिजीत दीपके आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी पोलिस उद्धटपणे वागत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. यावेळी अभिजीत दिपके यांनी पोलिसांवर संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याला जाबही विचारला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 10:20 AM
Abhijeet Dipke Police Security Demand, Cockroach Janata Party,

Abhijeet Dipke Police Security Demand, Cockroach Janata Party,

Follow Us
Follow Us:
  • सुरक्षेच्या नावाखाली पोलीस नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्याला घरी येण्यास मज्जाव
  • पोलिसांवर दबाव आणणे व अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तात्काळ सुरक्षा रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • व्हिडिओची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कायदेशीर पडताळणी सुरू
 

Abhijeet Dipke News: राज्यासह संपूर्ण देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर दीपके छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. आंदोलनादरम्यान, त्यांना टायफॉईडचे निदान झाल्यामुळे ते सध्या संभाजीनगर येथील राहत्या घरीच आहेत. त्याचबरोबक सीजेपीच्या आगामी रणनीतीबाबत बैठका सुरू असून, दीपके यांची भेट घेण्यासाठी नेते तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्या निवासस्थानी येत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी अभिजीत दीपके आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी पोलिस उद्धटपणे वागत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. यावेळी अभिजीत दिपके यांनी पोलिसांवर संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याला जाबही विचारला.

राज्यात 15 हजार PSI पदांची भरती केली जाणार; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती

या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षणा तात्काळ काढून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अभिजीत दीपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच, कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर अभिजीत दीपके यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.

धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने विवाहितेचा छळ; थेट पोर्तुगालमध्ये नेऊन विक्री केली,

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांना आपली भेट घेण्यापासून पोलीस रोखत असल्याचा

नागरिकांना आपली भेट घेण्यापासून पोलीस रोखत असल्याचा आणि त्यांच्याशी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप दीपके यांनी केला होता. यावेळी त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला थेट जाब विचारला.

“मी कोणाला भेटायचं हे पोलिसांनी मला सांगायचं नाही. मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार,” अशा शब्दांत दीपके यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, “तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचे पद काय आहे?” अशी विचारणाही त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला केली होती.

नागरिक आपल्याला भेटण्यासाठी येत असताना पोलीस त्यात हस्तक्षेप करत असल्याचा संताप व्यक्त करत दीपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला “तुम्ही बाहेर जा,” असे सांगितल्याचाही दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दीपके यांच्या पोलीस संरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 

Web Title: Abhijeet dipke police security removal demand police boys association

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Cockroach Janata Party
  • Maharashtra Police
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा
1

आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा

CJP ची ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेची घोषणा; ‘शिक्षण महाग, बेरोजगारी सर्वात मोठा प्रश्न’; अभिजीत दिपके यांची केंद्र सरकारवर टीका
2

CJP ची ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेची घोषणा; ‘शिक्षण महाग, बेरोजगारी सर्वात मोठा प्रश्न’; अभिजीत दिपके यांची केंद्र सरकारवर टीका

CJP Breaking News Update: CJPचा मास्टरप्लॅन, सरकारची वाढवणार डोकेदुखी; अभिजीत दिपकेंनी सांगितला भविष्यातील अजेंडा
3

CJP Breaking News Update: CJPचा मास्टरप्लॅन, सरकारची वाढवणार डोकेदुखी; अभिजीत दिपकेंनी सांगितला भविष्यातील अजेंडा

Sambhajinagar  CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!
4

Sambhajinagar CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.