Abu Azmi write letter to Letter to Assembly Speaker Rahul Narwekar to withdraw suspension
मुंबई : समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी हे चर्चेत आले आहेत. अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. यामुळे अगदी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. यामुळे कामकाज तहकुब देखील करण्यात आले. यावर आता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यंदाचे अधिवेशन हे जोरदार गाजते आहे. राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. विरोधकांनी यांनी अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला. तर सत्ताधाऱ्यांनी अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानावरुन टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,” अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “अबू आझमी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही. औरंगजेबाने मंदिर तोडली, महिलांची इज्जत लुटली, आमचा राजा कसा होता? औरंगजेबाने देशाला लुटलं, त्या औरंगजेबाची तुम्ही बढाई मारताय. अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे, ” अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाने दोषी करार दिला आहे. तसेच तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. आता ही शिक्षा स्थगित होणार की त्यांना शिक्षा दिली जाणार याचा निर्णय होणार आहे. याबाबत आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. यावर मत मांडताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “सत्ताधारी नेत्यांचा राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामाचं आहे. त्यांना कोर्टाने शिक्षा दिलेली आहे. आज त्यावर सुनावणी आहे, त्यानंतर हा निर्णय सरकार घेईल,” असे स्पष्ट मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते अबू आझमी ?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे. जोरदार टीका झाल्यानंतर अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ‘यू टर्न’ घेतला आहे.