
धारावी पुनर्वसन प्रकल्पात अदानीला तीव्र विरोध सुरू असताना धारावीलगत असलेल्या कुर्ला ते माहीम काजवे दरम्यान तसेच सीएसटी रोड येथील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची कामे अदानी समूहातील एका कंपनीला देण्यात आली आहेत. मिठी पात्रात संरक्षण भिंत बांधणे, रस्त्याची कामे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे अशी अनेक कामे यात अंतर्भूत आहेत.
२००५ च्या मुंबई महापुरात मिठी नदीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. २०१९ मध्ये पालिकेने मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. चार टप्प्यांत ही कामे केली जाणार होती, मात्र तिसऱ्या टप्प्यातील कामे काही वर्षांपासून निविदेच्या पातळीवर रखडली होती. ही रखडलेले कामे अदानी करणार आहे, दरम्यान, तिसऱ्या टण्यासाठी पालिकेने पुन्हा निविदा काढली.
त्यात अदानी समूहातील ( Adani Group) एका कंपनीने बोली लावली होती. सीएसटी रोड, कुर्ला ते माहीम कॉजवेदरम्यान संरक्षण भित व सेवा रस्त्याचे बांधकाम करणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे अशी अनेक कामे यात अंतर्भूत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून निविदेच्या पात्तळीवरच ही कामे रखडली होती. पालिकेने निश्चित केलेल्या प्रकल्प किमतीपेक्षा ७.७ टक्के जास्त दराने अदानी कंपनीने बोली लावली होती. चाटाघाटीनंतर सात टक्के अंतिम करण्यात आले. या कामाचे कार्यादेश देऊन आचारसंहिता लागू होण्याआधीच ही कामे सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तिसरा टप्पा मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी अदानी समूहातील एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. हे नुकतेच जाहीर झाले आहे.
भूमिगत बोगदा नदीची पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘पैकेज चार’ अंतर्गत भूमिगत मलजल बोगद्याचे खणन यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाची प्रगती मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम ६० ते ६४% पूर्ण झाले आहे.
अडचणी आणि घोटाळे गाळ काढण्याच्या कामामध्ये अनियमितता आढळल्याने काही कंत्राटदारांवर कारवाई झाली. या घोटाळ्यामुळे कामात अडथळे निर्माण झाले आणि अनेकदा पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका निर्माण होतो.