adv gunratna sadavarte in mumbai high court on maratha reservation protest by manoj jarange patil
High court on Maratha Protest : मुंबई : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्यासह हजारो मराठा समर्थक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईतील रस्त्यांवर, स्टेशनवर, मेट्रो स्टेशनवर सर्वत्र मराठा आंदोलकांनी ठाण मांडले आहे. यावरुन मुंबई हाय कोर्टामध्ये सुनावणी पार पडत आहे. यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या या आंदोलनावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई हाय कोर्टामध्ये मत मांडताना त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मदत केली जात असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. याचबरोबर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तुलना त्यांनी दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनासोबत केली आहे. यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये रस्त्यांवर आंदोलन केल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे. सदावर्ते म्हणाले की, मराठा आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तिथलं जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केल जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत. आंदोलक गाड्यांचे लायसन्स आहे का? असे वाहनधारकांकडे विचारात आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी रेल्वे स्टेशनवरील तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांना दाखवले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोर्टामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा देखील आरोप केला आहे. याबाबत ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक यांना अन्नधान्य ट्रकच्या माध्यमातून पुरवत आहेत. अंतरवालीत सराटीत पोलिसांना मारहाण झाली, महिला पोलिसांनाही मारहाण झाली. काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, पाण्याच्या बॉटल फेकल्या. महिला पत्रकारांची छेड काढली जात आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाची मुंबईतील परिस्थिती सांगितली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाची तुलना शाहीन बागच्या आंदोलनासोबत केली आहे. आंदोलकांना शाहीन बागप्रमाणे कोण फंड पुरवत आहे याची चौकशी व्हायला हवी असं सदावर्ते म्हणाले. आता मराठा आंदोलनाबाबत मुंबई हाय कोर्ट नेमका काय निर्णय देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुंबई नगरीमध्ये अशा पद्धतीने आंदोलन सुरु असल्यामुळे कोर्टाने देखील नाराजी व्यक्त केली आहे.