खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Maratha Reservation : पुणे : मराठा आरक्षणावरुन राज्यामध्ये वातावरण तापले आहे. ओबीसी अतंर्गत आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. त्यांच्यासह हजारो मराठा समर्थक हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवला होता. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठा बांधवांनी आग्रह देखील केला. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी पुणे दौरा केला असून भूमिका स्पष्ट केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर भूमिका स्पष्ट केली. खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, “जगात गणेशोत्सवाचा आनंद आहे, खूप मोठा उत्सव आज फक्त महाराष्ट्रात नसतो तर सगळ्या समाजात होतो, दर्शनासाठी मी आज आले आहे. सुख शांती समृध्दी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शक्ती मिळू दे. तेवढा आंदोलकांना हक्क आहे. युवक मुलं असतात, माझी नैतिक जबाबदारी आहे, मी लोकप्रतिनिधी आहे. सगळ्यांच्या भावनांच्या आदर केलाच पाहिजे, लोकांच्या वेदना ऐकून घेणं समजून घेऊन त्याच्यातून मार्ग काढणंही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही. मी गेले त्यावेळेस पाटलांना थकवा आला होता थोडक्यात चर्चा झाली,त्या भागात स्वच्छता राज्यातील मायबाप जनता एखाद्याला साथ देता त्याचा सार्थ अभिमान आहे,” अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “त्या ठिकाणी अस्वच्छता होती त्याचाही आढावा घेतला. आम्हाला छोटे छोटे पक्ष म्हणून ही हिणवले जात होते. अडीचशे आमदार तीनशे खासदार असलेला पक्ष परत शरद पवारांकडेच वळतो म्हणजे कमाल आहे. सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार आहे, २०१८ साली मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत भाषण केलं होतं त्यात सविस्तर माहिती दिली होती, देवेंद्र फडणीस यांनी जी 2018 मध्ये मांडले त्याची अंमलबजावणी करावी,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
आंदोलनाला जबाबदार आत्ताच सरकार
त्याचबरोबर त्या म्हणाल्या की, “शरद पवार यांनी काय केलं भोयर विचारत असतील तर पत्र पाठवून भोयर यांना माहिती देते. या सगळ्यांचा केंद्रबिंदू ज्यांचे आमदार, खासदार जास्त आहेत हे सगळे महायुतीकडेच आहे अपेक्षा सगळे शरद पवार यांच्याकडे आहे ही गंमत आहे. आंदोलनाला जबाबदार आत्ताच सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला विनम्र विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा,अधिवेशन बोलावा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका मुख्यमंत्र्यांना विनंती आहे,” असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा, गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे,जबाबदारी सगळी घ्यायची असते. कायदा सुव्यवस्था सरकार करत आहे का आणि काल जरांगे पाटील यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले आहे. सरकारकडून अजून कोणीही गेले नाही,पोलिस कोणी गेले नाही,अतिशय अस्वच्छता आहे, सरकार ऐकत नसेल पण काही अधिकारी काम करत आहेत.मुंबईकरांना वेठीस धरले जाते तर चर्चेला बसा,एक जर गेला आहे का कोणी सत्तेतील एक दोन सोडले तर. भुजबळ यांना का उतरावे लागते आहे, न्यायासाठी उतरवा लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.