Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti internal disputes: महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा

Mahayuti internal disputes: बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वेगळी भूमिका घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले. भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही भाजपवर थेट निशाणा साधला

  • By anuradha sagar
Updated On: Jun 04, 2026 | 03:43 PM
Mahayuti, ShivSena Shinde, BJP, Sanjay Gaikwad, Abdul Sattar,

Mahayuti, ShivSena Shinde, BJP, Sanjay Gaikwad, Abdul Sattar,

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून भाजपविरोधात उघड नाराजी
  • अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही- संजय गायकवाड
  • भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांचाही भाजपवर थेट निशाणा
Mahayuti internal disputes: महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून भाजपविरोधातील नाराजी अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर आता आमदार संजय गायकवाड आणि नरेंद्र बोंडेकर यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत, आमदार संजय बुलढाण्याचे गायकवाड यांनी अब्दुल सत्तार यांची भूमिका वास्तववादी असल्याचे सांगत मित्रपक्षांनी एकमेकांचे खच्चीकरण करणे महायुतीच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या मतदारसंघातही मित्रपक्षाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ५० आमदार बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेमध्ये सोबत आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे.”

कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! मविआ उमेदवार बाळ माने यांनी घेतला अर्ज मागे, पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

यासंदर्भात बोलताना उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगर जागेसाठी एकत्र बसून त्याच्यावर तोडगा निघेल. महायुती आणि आम्ही १७ जागा लढवत आहोत. त्या जागा महायुती जिंकणार, पूर्ण नंबर मेजॉरिटी महायुतीकडे आहे, महायुतीचे नियम पाळायचे हे अब्दुल सत्तार यांना सांगितलं आहे. ४ तारखेपर्यंत सर्व नीट होणार.”

समन्वय समितीत शिवसेना नेत्यांचा अपमान

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वेगळी भूमिका घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले. भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही भाजपवर थेट निशाणा साधला. अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांनी मांडलेल्या तक्रारी सत्य असल्याचे सांगत त्यांनी भंडारा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असल्याचा दावा केला, तसेच समन्वय समितीत शिवसेना नेत्यांचा अपमान होत असल्याचा आरोप करत परिणय फुके यांच्यावरही त्यांनी टीका केली.

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून

एकनाथ शिंदेंनी दिलेले आदेश मान्य : सत्तार

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य आहे. पुढे अंबादास दानवे यांच्या भेटीवर बोलताना सत्तार म्हणाले, आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो. मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार, असे ते म्हणाले.

सुनेत्रा पवारांना अर्थखाते मिळाले नाही!

संजय गायकवाड म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत देखील आमच्यासारखा खेळ होतो आहे का? असे दिसून येत आहे. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशा प्रकारे मित्र पक्ष असताना एकमेकांचे खच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असे गायकवाड म्हणाले.

 

Web Title: After abdul sattar sanjay gaikwad and narendra bondekar allegations on bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Mahayuti

संबंधित बातम्या

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार
1

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.