Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: महायुतीत बेबनाव तर माविआ काही ठिकाणी भक्कम, सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये ‘जत्रा’

सध्या संपूर्ण राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. अहिल्यानगरमध्ये तर काही ठिकाणी महायुती आणि माविआमध्ये फूट दिसली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 22, 2025 | 03:49 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची तयारी
  • सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये उमेदवारांची ‘जत्रा’
  • अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी महायुती आणि माविआमध्ये फूट
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आज पार पडला आणि त्यानंतर महायुती तसेच मविआ या दोन्ही आघाड्यांतील मोठी फूट स्पष्टपणे उघड झाली. विशेषत: महायुतीतील अंतर्गत कलह उजेडात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांना स्वातंत्र्य दिल्याचे महायुतीकडून वारंवार सांगितले जात होते; मात्र आजचे चित्र पाहता या नेत्यांमध्ये कोणतेही एकमत नसल्याचे स्पष्ट झाले.

राहाता, शिर्डी आणि संगमनेर वगळता जिल्ह्यातील इतर बहुतांश ठिकाणी महायुतीत मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे दिसत आहे. या फुटीमुळे जामखेड, श्रीरामपूर, पाथर्डी, श्रीगोंदे आणि शेवगाव येथील निवडणुका अधिकच चुरशीच्या झाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्येक नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याने पुढील दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होणार, अशी चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी ही फूट पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक स्तरावरील नाराजीतून निर्माण झाल्याचे दिसते.

नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी

अनेक निवडणूक कार्यालयात उमेदवारांची जत्रा

अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांना अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. काही गट उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते, तर काही गट अर्ज मागे जाऊ नये यासाठी जोर लावत होते. श्रीरामपुरात महायुतीच्या उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्यात आला होता; मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून त्यांना समजूत घातली. शिर्डीत भाजपाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्या प्रभागातील अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला.

जामखेड, पाथर्डी आणि शेवगावकडे लक्ष

जामखेडमध्ये महायुतीत आधीच फूट असताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या प्रिती राळेभात यांनी नगराध्यक्षपदासाठी बंड पुकारले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपा, अजित पवार गट आणि शिंदे गटातील शिवसेना, या तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवत असल्याने स्पर्धा अधिक तीव्र बनली आहे.

पाथर्डी आणि शेवगाव येथेही महायुतीत फूट पडली असून मविआ मात्र एकसंध व मजबूत दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणुकांत आमदार मोनिका राजळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद

श्रीगोंद्यातील फूट

श्रीगोंद्यात महायुतीत फूट असल्याचे चित्र समोर येत असले, तरी प्रत्यक्षात ही फूट आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या विरोधकांमध्ये असल्याचे दिसते. अजित पवार गट, भाजपा आणि शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार असले तरी त्यांचा रोख नेहमीच पाचपुते यांच्या विरोधात असतो. त्यामुळे ही फूट महायुतीतील नसून “पाचपुते विरोधकांचा अंतर्गत संघर्ष” असल्याचे अधिक योग्य ठरते. त्यात मविआनेही स्वतंत्र उमेदवार दिल्याने समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

श्रीरामपुरात दोन्ही आघाड्यांमध्ये तडे

श्रीरामपुरातही महायुती आणि मविआ, या दोन्ही आघाड्यांत फूट पडली आहे. भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे यांनी श्रीनिवास बिहाणी यांच्या हातात कमळ दिले. काँग्रेसने परंपरागत ससाणे कुटुंबातील करण ससाणे यांना उमेदवारी दिली. उबाठा गटाने स्वबळाचा नारा देत अशोक थोरे यांना रिंगणात उतरवले. अशा रीतीने श्रीरामपूरात दोन्ही आघाड्यांतील मतभेद अधिकच प्रकर्षाने जाणवत आहेत.

Web Title: Ahilyanagar news mahayuti and mavia in nagarpalika and nagarpanchayat election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला
1

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज
2

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार
4

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.