लोकल बॉडी इलेक्शन (फोटो- सोशल मिडिया)
उबाठा शिवसेनेमध्ये होणार मोठी उलथापालथ
५६ अर्जापैकी ५ नगरसेवक तर २ नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद
सर्व नाराज कार्यकर्त्यांच काढली समजूत
गुहागर: गुहागर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७प्रभागांमध्ये दाखल झालेल्या एकूण ५६ अजापैकी ५ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने ५१ उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठीचे दाखल झालेल्या ७ अजर्जापैकी २ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांमध्ये नाराजी दिसून आली. नाराज उमेदवार आपली मते कोणाच्या मतपेटीत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या ऐन थंडीमध्ये गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे राजकारण तापू लागले आहे.
गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ जागांसाठी एकूण ५६ दाखल झाले होते. या अर्जामध्ये प्र. क्र. १७मधील ३ उमेदवार अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये तन्वी निलेश कनगुटकर यांनी उबाठा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु या अर्जाला एबी फॉर्म न जोडल्याने उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. आकांक्षा सर्वेश आरेकर या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या. त्यांचाही अर्ज बाद झाला आहे. सिद्धी आरेकर यांनी याच प्रभागातून २ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांचा बाद झाला आहे.
‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
प्र. क्र. १ मधून उबाटा शिवसेनेचे उदय अवधूत होळंब यांनी एबी फॉर्म न लावल्याने यांचा अर्ज बाद झाला आहे. याच प्रभागातून शिवसेने मधून वीरेश मुरलीधर बागकर यांनाही एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी उबाठा शिवसेनेमध्ये मोठी उलथा पालत झाली आहे. पारिजात कांबळे आणि स्नेहा भागडे असे २ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुहागरमध्ये कुणबी समाजाचे प्राबल्य असल्याने व गतवेळी समाज संघटनेतून उभ्या राहिलेल्या स्नेहा भागडे यांनी उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होत्या.
सर्व नाराज कार्यकर्त्यांची काढली समजूत
उबाठा शिवसेनेकडून पारिजात कांबळे यांच्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडण्यात आला होता. परिणामी छाननीमध्ये पक्षातर्फे एबी फॉर्म नसल्याने स्नेहा भागडे यांचा नगराध्यक्ष पदचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भागडे या नाराज होऊन गेल्या, या प्रकारने नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर आ. भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित राहून सर्व नाराज कार्यकत्यांची समजूत काढली. भाजपाकडून नीता विकास मालक यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरताना दोन अर्ज भरले होते या दोन अर्जापैकी एक अर्ज बाद करण्यात आला आहे.






