
Ajit Pawar Angry over State Women's Commission Chairperson Rupali Chakankar reacts to Sampada Munde suicide case
Ajit Pawar on Chakankar : पुणे: फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्या आहेत.
फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी डॉक्टर महिलेच्या फोनची हिस्ट्री सांगत सदर महिला अनेकांसोबत बोलत असल्याचे चाकणकर म्हणाल्या आहेत. आत्महत्या केलेल्या महिलेच्या मृत्यूमनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर तिचे चारित्र्यहनन करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन रुपाली चाकणकर यांचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद धोक्यामध्ये आले आहे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत वक्तव्य मान्य नसल्याने सांगितले आहे. यामुळे रुपाली चाकणकर यांना त्यांच्या पदावर पायउतार व्हावे लागणार असल्याची चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलताना पवार यांनी चाकणकर यांच्या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “महिला आयोग महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाला भेटायला हवे होते,” असे पवार म्हणाले. त्याऐवजी आरोपीच्या घरी जाऊन निवेदन घेतल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “मी या भूमिकेशी सहमत नाही. या प्रकरणाची चौकशी होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या घटनेमुळे चाकणकर यांच्या अध्यक्षपदावर राजकीय दबाव वाढला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकरणात पीडित डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि खोटे अहवाल तयार करण्याचा दबाव असल्याचे समोर आले आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सातारा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले, तरी त्यांच्या भूमिकेत त्रुटी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत तणाव वाढला असून, विरोधकांनी राजीनामा मागितला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबीयांना न्यायाचे आश्वासन दिले असून, चौकशी अहवाल मागवला आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.