डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड बनवल्या प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला (फोटो - सोशल मीडिया)
Rohit Pawar News: मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे अनेकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येतात. त्यांनी आधार कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेवर हल्लाबोल केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदार रोहित पवार यांच्यावर बोगस आधार कार्ड आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने याविरोधात तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रोहित पवारांनी लोकशाही मार्गाने आणि संविधानिक जबाबदारीनुसार हे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, राज्य सरकार आणि गृह विभागाने चौकशीऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लोकशाहीवर आघात केला आहे. मातेले यांनी सरकारला थेट सवाल विचारला आहे की, बोगस आधार कार्ड तयार करण्याचा प्रकार सरकारच्या परवानगीने सुरू आहे का? निवडणूक आयोगाने याबाबत कोणती चौकशी केली? जनतेच्या नावे बोगस मतदार यादी होत आहे का? जर बोगसगिरी होत नसेल, तर सरकारने पुराव्यांसह सिद्ध करावे. अन्यथा, रोहित पवारांचा मुद्दा योग्य ठरतो आणि गुन्हा सरकारवर दाखल व्हायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासठी क्लिक करा
राष्ट्रवादी पक्षाने हा प्रकार विरोधकांना गप्प करण्याची आणि प्रश्न विचारणाऱ्याला गुन्हेगार ठरवण्याची संस्कृती म्हटले आहे. कलम १९ (१) अ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, जनतेचा आवाज दाबणे संविधानिक अधिकारांवर गदा आहे. सरकारने गुन्हा मागे घ्यावा आणि निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“लोकशाहीत प्रश्न विचारणं गुन्हा नसतं; गप्प बसणं हा खरा अपराध आहे,” असे मातेले यांनी ठणकावले. पक्ष जनतेच्या हक्कांसाठी ही लढाई सुरू ठेवेल, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा






