Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP foundation day postponed: राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलला; काय आहे नेमकं कारण?

यंदाचा वर्धापन दिन अनेक राजकीय घडामोडींमुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षातील अंतर्गत बदल, विलिनीकरणाच्या चर्चांपासून ते विविध राजकीय वादांपर्यंत अनेक मुद्द्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही महिन्यांत चर्चेत राहिली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 10:28 AM
Ajit Pawar NCP foundation day postponed 2026, NCP, Suni Tatkare

Ajit Pawar NCP foundation day postponed 2026, NCP, Suni Tatkare

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला वर्धापन पुढे ढकलला
  • 10 जूनला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) महत्त्वाची बैठक
  • दादांच्या निधनानंतर पहिलाच वर्धापन दिन
 

Ajit Pawar NCP Anniversary: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला वर्धापन दिन येत्या १० जूनला होणार होता. दोन्ही राष्ट्रवादींचे वर्धापन दिन मुंभईत होणार असल्याचीही माहिती समोर आली होती. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचा यंदा २७ वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये ११ जूनला साजरा करण्यात येणार आहे.

दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) महत्त्वाच्या बैठकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999 रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. त्यानिमित्त दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा त्याच दिवशी दिल्लीत NDA ची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

Government Exams : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? एकाच वेळी १९ परीक्षा पास करणाऱ्या चारू पांडेचे ‘हे’ सक्से

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम 11 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.

“ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याने आदरणीय वहिनी आणि मला उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन 10 जूनऐवजी 11 जून रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, “दादांच्या निधनानंतर आम्ही प्रथमच वर्धापन दिन साजरा करत आहोत. वहिनींनी अत्यंत धैर्याने पक्षाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे काम सुरू आहे,” असे ते म्हणाले.
यंदाचा वर्धापन दिन ‘दादांना समर्पण, संघर्ष आणि संकल्प’ या संकल्पनेवर आधारित असणार असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली… थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

दरम्यान, यंदाचा वर्धापन दिन अनेक राजकीय घडामोडींमुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षातील अंतर्गत बदल, विलिनीकरणाच्या चर्चांपासून ते विविध राजकीय वादांपर्यंत अनेक मुद्द्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही महिन्यांत चर्चेत राहिली आहे. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाची पुढील राजकीय दिशा आणि नेतृत्वाची भूमिका याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. पण या 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत एनडीए घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या एनडीएच्या राष्ट्रीय बैठकीला देशभरातील सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि एनडीएचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 10 जून रोजी दिल्लीतील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

 

 

Web Title: Ajit pawar ncp foundation day postponed 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP

संबंधित बातम्या

नगरसेवक किशोर मासाळ राजीनामा द्या, अन्यथा…; बारामती राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा इशारा
1

नगरसेवक किशोर मासाळ राजीनामा द्या, अन्यथा…; बारामती राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा इशारा

Chhagan Bhujbal Rajyasabha: छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार! सुनेत्रा पवारांच्या जागेवर महायुतीत एकमत; नवनीत राणांचा पत्ता कट?
2

Chhagan Bhujbal Rajyasabha: छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार! सुनेत्रा पवारांच्या जागेवर महायुतीत एकमत; नवनीत राणांचा पत्ता कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.