Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राज्यपालपद स्वीकारणार का? हे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सध्या त्यांच्या पक्षामधील अंतर्गत कलहामुळे नाराज आहेत. त्यांची नाराजी सर्वश्रूत असून त्यांना राज्यपाल पदाची ऑफर दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 31, 2025 | 03:44 PM
'कोण काय म्हणत मला देणं-घेणं नाही'; छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय?

'कोण काय म्हणत मला देणं-घेणं नाही'; छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज असल्याचे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता पुण्यातील एका संस्थेच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.  यावेळी भुजबळ म्हणाले की, 2014 मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

पुढे माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे,” अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ते पुढे म्हणाले, “तेलगी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत व ते सिद्धही झाले नाही त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे, तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो,” अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावर भुजबळ म्हणाले की, “जरांगेंच्या आंदोलनामध्ये मी ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी भावना निर्माण झाली त्याचा निश्चितच फटका मला बसला आणि माझे मताधिक्य कमी झाले. परंतु तरीही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असे अनेकांना वाटते, परंतु छगन भुजबळ चा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी माझा वापर कोणालाही करू देत नाही,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल होणार का? 

तुम्ही आता राज्यपाल होणार का? याविषयावर ते पुढे म्हणाले, “राज्यपाल हे अतिशय मानाचे पद आहे. त्या पदाचा मी मान राखतो परंतु माझा स्वभाव हा अन्यायाविरोधात बोलण्याचा आणि संघर्ष करण्याचा आहे राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही, मला राज्यपाल करणे म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच मी राज्यपाल पद स्वीकारू शकत नाही,” असे छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Ajit pawar ncp upset chhagan bhujbal expressed on the governor of state offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Chhagan Bhujbal
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा
1

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

Sharad Pawar Health Update: “पुढच्या 48 तासांत डिस्चार्ज मिळणार “, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर
2

Sharad Pawar Health Update: “पुढच्या 48 तासांत डिस्चार्ज मिळणार “, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी
3

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Neelam Gorhe: डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ला भेट; सुमारे ९४ वर्षे ही संस्था…
4

Neelam Gorhe: डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ला भेट; सुमारे ९४ वर्षे ही संस्था…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.