Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार: मुख्यमंत्री पदाची हुलकावणी: एका संघर्षाचा न संपलेला प्रवास

२०२४ अजित पवार यांनी खुलेआम मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती.मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण वारंवार उपमुख्यमंत्रीपदावर अडकतो." असं विधान त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 28, 2026 | 01:40 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News, maharashtra politics,

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News, maharashtra politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन
  • 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणे ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती
  • २००८ सालीही अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर आली
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. आज सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमरास बारामतीत विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता, की विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा एक वेगळाच दरारा होता. महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘दादा’ अशी ओळख त्यांनी तयार केली होती. राजकारणात प्रवेश केल्यापासूनच अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न कुणापासून लपून राहिले नव्हते. गेल्या चाळीस वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांना मुख्यमंत्री पदाच्या संधी आल्या पण प्रत्येकवेळी मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली.

अजित पवार यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये अजित पवार यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. अजित पवार यांनी पाटबंधारे आणि फलोत्पादन हे खाते मिळाले. २००४ मध्ये अजित दादांची नाराजी पहिल्यांदाच समोर आली. २००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शरद पवार यांनी काँग्रेसशी बोलणी करून मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात पवारांनी 2 कॅबिनेट पदं आणि अतिरिक्त राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घेतली.

Ajit Pawar Death: पहाटेचा शपथविधी ते पक्षफूट… अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण

त्यावेळी अजितदादांना जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्याचे मंत्रीपद मिळाले. मुख्यमंत्रीपद चालून आलेले असतानाही  त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही.  ‘2004 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणे ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

२००८ सालीही अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांऐवजी छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली होती. मात्र, २०१० मध्ये ‘आदर्श घोटाळा’ समोर आल्यानंतर भुजबळांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या पदासाठी शरद पवारांची पहिली पसंती अजित पवार नसून दुसराच नेता होता, हे स्पष्ट झाल्यामुळे ती सल अजितदादांच्या मनात कायम राहिली असावी, असे म्हटले जाते.

दरम्यान, 2009 मध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंची राजकारणात एंट्री झाल्यानंतर शरद पवार यांचा खरा वारसदार अजित पवार नसून सुप्रिया सुळे याच आहेत, आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास सुप्रिया सुळेचंच नाव पुढे केलं जाईल, अशाही चर्चा सुरू असायच्या.

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राचे ‘दादा’

अजित पवारांचा राजकीय प्रवास आणि सत्तासंघर्ष

२०१२ मध्ये सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला, मात्र काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पुढे २०१९ मध्ये रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी झाले, तर अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. या निकालामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची नाराजी आणि महत्त्वाकांक्षा ‘पहाटेच्या शपथविधी’तून जाहीरपणे समोर आली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मोठा राजकीय भूकंप घडवला. मात्र, शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीमुळे ते पुन्हा पक्षात परतले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजितदादांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले; त्यावेळीही मुख्यमंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

२०२३ मधील राजकीय उलथापालथ

२०२३ मध्ये राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे झाली, अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. त्यांच्या बंडाच्या काळात अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. अशा चर्चा सुरू झाल्या. केवळ मुख्यमंत्रिपदाचे ध्येय गाठण्यासाठीच अजित पवार पुन्हा एकदा बंडखोरी केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. पण त्यावेळीही अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

त्यानंतर २०२४ अजित पवार यांनी खुलेआम मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती.मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण वारंवार उपमुख्यमंत्रीपदावर अडकतो.” असं विधान त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. “मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण मला संधी मिळत नाहीये,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची मोठी संधी होती, परंतु पक्षाने ती गमावली, असेही त्यांनी नमूद केले.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत ७१ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. तरीही, राजकीय तडजोडीत मुख्यमंत्रिपद काँग्रेसच्या खात्यात गेले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख यांचे २०१२ मध्ये निधन झाले.” असंही त्यांनी नमुद केलं होतं.

 

Web Title: Ajit pawar plane crash ajit pawars unfulfilled dream of becoming chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र पोरका, तिरंगा अर्ध्यावर! उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी काय आहे प्रोटोकॉल? जाणून घ्या नियम
1

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र पोरका, तिरंगा अर्ध्यावर! उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी काय आहे प्रोटोकॉल? जाणून घ्या नियम

Ajit Pawar funeral : अजित पवार यांच्यावर आजच संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार; बारामतीमध्ये लोटला जनसमुदाय
2

Ajit Pawar funeral : अजित पवार यांच्यावर आजच संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार; बारामतीमध्ये लोटला जनसमुदाय

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना
3

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव
4

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.