Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar funeral : अजित पवार यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार; बारामतीमध्ये लोटला जनसमुदाय

Ajit Pawar funeral Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले आहे. यानंतर उद्या त्यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 28, 2026 | 03:09 PM
DCM Ajit Pawar funeral held on 28 january evening at baramati live news update

DCM Ajit Pawar funeral held on 28 january evening at baramati live news update

Follow Us
Follow Us:

Ajit Pawar funeral : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्यावर उद्या (दि.29) अंत्यसंस्कार होणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिगदरम्यान अपघात झाला. मुंबईहून बारामतीला हे विमान चालले होते. मुंबईतून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले होते. यानंतर बारामतीमध्ये आठ वाजून 50 मिनिटांनी लँडिंग होणार होते. मात्र लँडिंगच्या वेळी क्रॅश झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांचे पार्थिव सध्या बारामती रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार होणार आहे. सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असून याचा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हे देखील वाचा: अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. लवकरच जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार या लवकरच बारामतीला पोहचणार आहेत. यानंतर पुढील निर्णय घेतले जातील अशी माहिती रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: कल्पक आणि एकमेव निर्भीड राजकीय…’दादामाणूस’ गेल्याची भावना; अमित देशमुख यांनी व्यक्त केला शोक

कोण होते विमानामध्ये?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण उपस्थित होते. अजित पवारांसोबत एक पी.एस.ओ. आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. तसेच विमान नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सह-पायलट यांचासुद्धा समावेश होता. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात एवढा भीषण होता की क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणत्याही व्यक्तीला वाचवण्यात यश आले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title: Dcm ajit pawar funeral held on 28 january evening at baramati live news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar news
  • ajit pawar plane crash

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
2

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.