Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून राजकारण शिकले, अजित पवार कसे झाले महाराष्ट्राच्या राजकारणाचे 'दादा'
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. आज सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमरास बारामतीत विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाच अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता, की विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा एक वेगळाच दरारा होता. महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘दादा’ अशी ओळख त्यांनी तयार केली होती.
Ajit Pawar Death : काका-पुतणा-बहीण-पत्नीही आहे राजकारणात… किती मोठं आहे अजित पवारांचं कुटुंब?
अजित यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र होते. त्यांचे वडील राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांनी राजकारणाचे धडे गिरवले. शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाची मूलतत्त्वे शिकली. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एक प्रमुख व्यक्ती होते. अजित पवारांनी आठ वेळी उपमुख्यमंत्री पद भुषवले. विविध सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केले.
१९८० च्या दशकात त्यांचे काका शरद यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यांना पहिले निवडणूक यश मिळाले. त्यानंतर त्यांनी काकांची जागा भरण्यासाठी लवकरच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद यांनी पोटनिवडणूक जिंकली. तत्कालीन केंद्रातील पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री झाले.पण त्याचवेळी ते महाराष्ट्राच्या राजकारणात हसतमुख चेहरा, कामाच्या शिस्तीमुळे आणि त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे अजित पवारांनी काही काळातच महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली. बारामतीचे दादा महाराष्ट्राचे दादा म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९९५ मध्ये अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हापासून ते या मतदारसंघातून सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत. १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये ते विजयी झाले आहेत. त्यांनी केवळ राजकीय जीवनात स्वतःला स्थापित केले नाही तर स्वतःचा प्रभावही निर्माण केला आहे.
विमान अपघातात शरद पवार यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे काका शरद पवार दिल्लीहून बारामतीला रवाना झाले. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह होत्या. देशभरातील राजकारणी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने बारामतीतील लोकांना खूप दुःख झाले आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला आहे.






