Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Amit Shah : नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. यावेळी अमित शाहांनी मोदींच्या कारकिर्दीवर भाष्य करत मोठे दावे केले.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 07:39 PM
PM Narendra modi and Amit Shah

PM Narendra modi and Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • 2014 नंतर भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाला आळा बसल्याचा अमित शाहांचा दावा
  • मोदींच्या 25 वर्षांच्या शासनप्रमुखपदाच्या कारकिर्दीनिमित्त महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून विकासाची वाटचाल सुरू असल्याचं अमित शाहांचं वक्तव्य
 

Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या 25 वर्षांच्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीवर भाष्य करत मोठा दावा केला.

अमित शाह म्हणाले, “2014 पूर्वी देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाच्या विळख्यात अडकला होता. मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या तिन्ही नकारात्मक प्रवृत्तींना आळा बसला,” असा दावा त्यांनी केला. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे येत असून देशाची वाटचाल विकसित राष्ट्राच्या दिशेने सुरू असल्याचंही शाह म्हणाले.

मोदी यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 25 वर्षे शासनप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. एवढ्या मोठ्या कालावधीत सातत्याने जनतेची सेवा करणं ही मोठी बाब असल्याचं अमित शाह यांनी नमूद केलं.

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

महिनाभर भाजपचं ‘सेवा संकल्प अभियान’

मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त भाजपकडून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवलं जाणार आहे. या महिनाभरात भाजपच्या वतीने 12 प्रमुख कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.

मोदी यांनी स्वतःला ‘प्रधान सेवक’ म्हणून संबोधत जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलं, असंही शाह म्हणाले. त्यांच्या कार्यशैलीवर गुरुनानक यांच्या विचारांचा तसेच समर्थ रामदास स्वामींच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ या संकल्पनेचा प्रभाव असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील… : सेवा दिवस
: माझ्या स्वप्नांचा भारत चित्र
: नमो सेवेच्या न ऐकलेल्या गोष्टी
: संगीतमय नाट्य सादरीकरण (स्थानिक भाषांमध्ये)
: अंगण मिलन सेवा
: सेवेची कथा
: सेवा ज्योती कलश यात्रा
: वडनगर ते वाराणसी सेवा… pic.twitter.com/FnIoFvLaKs
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 13, 2026

भारताची अर्थव्यवस्था आणि विकासावरही भाष्य

अमित शाह यांनी मोदी सरकारच्या काळातील आर्थिक आणि सामाजिक बदलांचाही उल्लेख केला. त्यांच्या दाव्यानुसार, देशातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून भारताच्या विकासाला नव्या दिशेने गती मिळाली आहे.

तसंच मोदींच्या नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत वाढली असून भारतीय पासपोर्टचं महत्त्वही वाढल्याचं अमित शाह यांनी म्हटलं. त्यामुळे मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेत भाजपकडून महिनाभर विविध सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत.

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Web Title: Amit shah narendra modi 25 years seva sankalp abhiyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
1

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

BRICS Summit 2026 : पंतप्रधान मोदी आणि इजिप्त राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांची द्विपक्षीय चर्चा; नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर
2

BRICS Summit 2026 : पंतप्रधान मोदी आणि इजिप्त राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांची द्विपक्षीय चर्चा; नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

Modi-Xi Jinping Meeting: सीमेवर शांतता अन् संबंधांत संतुलन; मोदी-शी जिनपिंग बैठकीतील 7 मोठे खुलासे
3

Modi-Xi Jinping Meeting: सीमेवर शांतता अन् संबंधांत संतुलन; मोदी-शी जिनपिंग बैठकीतील 7 मोठे खुलासे

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.