Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Amit Shah Maharashtra Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकरी संकटात असताना दौऱ्याचा उपयोग कशासाठी, असा सवाल करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 07:11 PM
अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • अमित शहांचा महाराष्ट्र दौरा ‘मेवा संकल्प अभियान’ असल्याचा सपकाळांचा आरोप
  • दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी
  • RSSच्या संविधान आणि मुस्लिम समाजाबाबतच्या भूमिकेवर काँग्रेसचा सवाल
 

Amit Shah Maharashtra Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमित शहांच्या दौऱ्यावर जोरदार निशाणा साधत हा दौरा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियान’ असल्याची टीका केली आहे.

सपकाळ म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन भाजपला राजकीय आणि आर्थिक फायदा कसा मिळवता येईल, याचाच विचार या दौऱ्यात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.

शेतकरी संकटात, मग मदत कुठे?

महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गंभीर असताना शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, असं सांगत सपकाळ यांनी अमित शहांना थेट आव्हान दिलं. खरंच महाराष्ट्राची सेवा करायची असेल तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

तसंच महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांवरूनही सपकाळ यांनी सरकारला सवाल केला. उद्योगपतींना कोणत्या जमिनी देण्यात आल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला आणि या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाला का, याचा हिशोब जनतेसमोर मांडला पाहिजे, असं ते म्हणाले.

कुंभमेळ्याच्या खर्चावरूनही त्यांनी सरकारला घेरलं. हजारो कोटींच्या खर्चाचा हिशोब जनतेला मिळायला हवा, अशी मागणी करत या पैशांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

RSSच्या भूमिकेवरूनही घमासान

यावेळी सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवरही टीका केली. संघाचं सध्याचं ‘लिबरल’ रूप हे केवळ दाखवण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधान, तिरंगा आणि मुस्लिम समाजाबाबत संघाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विशेषतः सरसंघचालक मोहन भागवत यांनी या मुद्द्यांवर थेट खुलासा करावा, असं सपकाळ यांनी म्हटलं. त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात भाजप-काँग्रेसमधील जुना संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

Web Title: Amit shah maharashtra visit harshwardhan sapkals meva sankalp criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
3

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
4

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.