Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

‘सेवा संकल्प’ अभियानावरही राऊतांनी सरकारवर टीका केली. मागील अनेक वर्षांत सरकारने नेमकी कोणाची सेवा केली, असा सवाल करत त्यांनी उद्योगपतींच्या हितासाठी सरकार काम करत असल्याचा आरोप केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2026 | 12:13 PM
'अमित शहा मुंबईत आले की...'; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

'अमित शहा मुंबईत आले की...'; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. अमित शाह मुंबईत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतो, असा आरोप राऊत यांनी केला. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर मोठी गर्दी असताना सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते बंद केले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, अमित शाह मुंबईत आले की त्यांच्या सुरक्षेचा मोठा ताण मुंबई पोलिसांवर पडतो. गणेशोत्सवाच्या काळात मंडप, मूर्ती आणि खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असताना रस्ते बंद केल्याने मुंबईकरांना त्रास होतो. देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी दिल्लीसह मणिपूर, आसाम आणि पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले.

मुंबई दौऱ्यादरम्यान उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या भेटींवरूनही राऊतांनी टीका केली. अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून त्यानंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही दर्शन घेणार असल्याचे सांगत, राऊतांनी उद्योगपतींशी संबंधित गणपतींच्या दर्शनावरूनही टोला लगावला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राऊत म्हणाले…

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत यांनी सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका मांडली. जरांगेंच्या भाषेवर सरकार आक्षेप घेत असेल, तर सभ्य आणि संस्कारी भाषेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘सेवा संकल्प’ अभियानावर निशाणा

‘सेवा संकल्प’ अभियानावरही राऊतांनी सरकारवर टीका केली. मागील अनेक वर्षांत सरकारने नेमकी कोणाची सेवा केली, असा सवाल करत त्यांनी उद्योगपतींच्या हितासाठी सरकार काम करत असल्याचा आरोप केला.

ब्रिक्सच्या मेनूवरून टोला

ब्रिक्स परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या जेवणाच्या मेनूवरूनही संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी भारतीय खाद्यसंस्कृतीसोबत त्यांच्या आवडीचे पदार्थही असायला हवेत, असे ते म्हणाले. मेनूवरून त्यांनी उपरोधिक टिप्पणीही केली.

मंत्रालयातील कलशस्थापनेवर भूमिका

मंत्रालयातील धार्मिक विधींवर प्रत्येक गोष्टीला विरोध करता येणार नाही, असे राऊत म्हणाले. मात्र, सरकारने अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Amit Shah News : ४०१ फरार गुन्हेगारांवर रेड कॉर्नर नोटीस; परदेशातील भगोड्यांवर अमित शाहांचा सर्जिकल स्ट्राईक

Web Title: Sanjay raut criticizes amit shah over his mumbai visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Maharashtra Politics
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
1

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
3

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
4

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.