Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray Speech: ‘मी विसरलो, खरंच सुचत नाही…’, अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

Amit Thackeray Speech:  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित ठाकरे भाषणादरम्यान अचानक भावूक झाले. "मला काय बोलायचं सुचत नाही... मी परत येतो," असे म्हणत ते काही काळ व्यासपीठावरून खाली उतरले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 01:29 PM
'मी विसरलो, खरंच सुचत नाही...', अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

'मी विसरलो, खरंच सुचत नाही...', अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

Follow Us
Follow Us:
  • अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले
  • सभागृहात क्षणभर शांतता
  • भाषणादरम्यान अचानक का थांबले?
Amit Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, (Amit Thackeray) पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही औपचारिक सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अलीकडील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर ते काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता होती. मात्र भाषणादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला.

Thackeray Brothers Congratulate Protesting: मुंबईत विजयाचा जल्लोष! शिवतीर्थावर युवकांची गर्दी, घोषणाबाजीने परिसर दणाणला

भाषणादरम्यान अचानक थांबले

विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत अमित ठाकरे म्हणाले, “ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.” त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो. पण मी इथे केवळ त्यांचा मुलगा म्हणून नाही, तर त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे टिकून आहे.”

याच वेळी ते भावूक झाले आणि “मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत काही काळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले. सभागृहात क्षणभर शांतता पसरली. काही वेळानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि आपले भाषण पूर्ण केले.

‘राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्यामागे’

पुन्हा भाषण सुरू करताना अमित ठाकरे म्हणाले, “मी पाठ करून आलेलो नाही. तुम्हा सर्वांना पाहून धडकी भरली. आतापर्यंत केलेली कामं विसरून जा. आता पुढे काय करायचं आहे, याचा विचार करा. तुमची ताकद तुम्हालाच कळली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या आठवड्यात आपण विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढत होतो. तो आत्मविश्वास मला तुमच्या पाठिंब्यामुळे मिळाला. माझ्यामागे तुमची ताकद आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती आहे.”

सरकारवरही साधला निशाणा

अमित ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका करत सरकारवरही निशाणा साधला. “लोक विकासासाठी मतदान करतात. पण पाच वर्षांत काम न करणाऱ्यांना बदलण्याची वेळ आली, तर मतदारांनी निर्णय घ्यायला हवा,” असे ते म्हणाले. तसेच विद्यार्थी आंदोलन, राज्यातील विविध प्रश्न आणि आगामी काळातील संघटनबांधणीवर भर देत त्यांनी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

‘मला तुमची साथ हवी’

भाषणाच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न राजसाहेबांचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी विद्यार्थी संघटना उभी करायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे.” अमित ठाकरे यांच्या या भावनिक भाषणाची आणि व्यासपीठावरून काही काळ खाली उतरण्याच्या प्रसंगाची कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा

Web Title: Amit thackeray emotional speech pauses midway mns student wing 20th anniversary membership drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Nashik News: ‘लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार’ नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप
1

Nashik News: ‘लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार’ नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप

‘बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?’ प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2

‘बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?’ प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

Thackeray Brothers Congratulate Protesting: मुंबईत विजयाचा जल्लोष! शिवतीर्थावर युवकांची गर्दी, घोषणाबाजीने परिसर दणाणला
3

Thackeray Brothers Congratulate Protesting: मुंबईत विजयाचा जल्लोष! शिवतीर्थावर युवकांची गर्दी, घोषणाबाजीने परिसर दणाणला

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.