Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांचं उपोषण स्थगित करून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली. यावर त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी सवाल उपस्थित करत ED संदर्भातही दावा केला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 18, 2026 | 09:53 PM
manoj jarange breaking fast

manoj jarange breaking fast

Follow Us
Follow Us:
  • ‘एक मिनिटही देणार नाही’ म्हणणारे तीन महिन्यांचा वेळ कसा देतात?
  • ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; अमोल खुणेंचा दावा
  • ‘जरांगे माझ्यासमोर बसावेत’; जुन्या सहकाऱ्याचं थेट आव्हान
 

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं 20 दिवसांचं उपोषण अखेर 17 सप्टेंबरला स्थगित केलं. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगेंनी हा निर्णय घेतला. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर पुढील आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या निर्णयानंतर आता जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे, उपोषणाच्या सुरुवातीला सरकारच्या शिष्टमंडळाने वेळ मागितल्यानंतर ‘एक मिनिटही देणार नाही’ अशी भूमिका घेतली होती, मग आता तीन महिन्यांचा वेळ कसा काय दिला, असा सवाल खुणे यांनी उपस्थित केला.

‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’

अमोल खुणे यांनी पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवरही प्रश्न उपस्थित केले. ‘ED ची भीती वाटली म्हणून जरांगे पाटोद्यात थांबले’, असा दावा त्यांनी केला. तसेच आपल्यासह काही लोकांवर ED कारवाई होण्याची चर्चा असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज

‘जरांगे प्रत्येक लढाईला रडत जातात’

खुणे यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही जोरदार टीका केली. ‘एक तरी मावळा कुठल्या मोहिमेवर रडत गेला का?’ असा सवाल करत त्यांनी जरांगेंवर बोचरी टिप्पणी केली. आंदोलनात नाट्यमयता आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतकंच नाही तर ‘मनोज जरांगे जर खरे असतील, तर माझ्यासमोर बसावं’, असं थेट आव्हानही अमोल खुणे यांनी दिलं. आपण चुकीचे ठरलो तर समाज देईल ती शिक्षा स्वीकारण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन संपलेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारला दिलेली तीन महिन्यांची मुदत आणि त्यानंतरची भूमिका याकडे आता मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Amol khune criticises manoj jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
2

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत
3

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
4

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.