Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगेंबाबत आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेबाबत भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Sep 17, 2026 | 09:28 PM
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

Follow Us
Follow Us:
  • ‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’ – प्रताप सरनाईक
  • ‘जरांगे पाटील आमचे समाजबांधव, कोणताही अपशब्द वापरला नाही’
  • जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
 

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेत सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर होणारी टीका आणि जरांगे पाटील यांच्याबाबतची भूमिका सरनाईक यांनी स्पष्ट केली.

‘शिंदे आमचे नेते आहेत. त्यांना कोणीही बोललं तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार,’ असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. त्यामुळे जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यातील शाब्दिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना सरनाईक यांनी आक्रमक भूमिका न घेता स्पष्टीकरण दिलं. ‘जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्ही कोणताही अपशब्द वापरलेला नाही. तेही आमचे समाजबांधव आहेत,’ असं त्यांनी सांगितलं. तसेच पुढील तीन महिन्यांत जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार निश्चितपणे विचार करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान हैद्राबाद गॅझेटसह मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवर भूमिका मांडली होती. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर अखेर त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला.

याचवेळी सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांवरही नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अशा महत्त्वाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणं गरजेचं असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

तानाजी सावंत यांच्यासह इतर चार आमदारांच्या अनुपस्थितीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे जरांगे पाटील यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे, तर दुसरीकडे शिंदे यांच्या मंत्र्यांकडून त्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून कोणती पावलं उचलली जातात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

Web Title: Pratap sarnaik on manoj jarange patil eknath shinde maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
1

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
2

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
4

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.