Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जरांगे यांना वारंवार का फसवते आणि जरांगे स्वतः का फसतात, याची समीक्षा करण्याची गरज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 03:26 PM
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण

Follow Us
Follow Us:
  • कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकार निशाणा
  • मराठा आरक्षणावरून सरकारवर टिकास्त्र
  • वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल 
Vijay Vadettiwar on Maharashtra Government/Maharashtra Politics: कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्र सरकारवर अनेक विषयांवर निशाणा साधला आहे. यूपीये व्यवहारांवरील शुल्क ते मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त करून बँका बुडतील अशी स्थिती पंतप्रधान मोदी यांनी निर्माण करून ठेवली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. UPI द्वारे होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या व्यवहारावर बँका १२ रुपये वसूल करणार असून, व्यापाऱ्यांवर पडणारा हा भार अंतिमतः सामान्य ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जाईल.एक लाखाच्या व्यवहारावर सरकार थेट ६०० रुपये वसूल करणार आहे. ही सामान्य जनतेची उघड फसवणूक असून, गरिबांचे पैसे लुटून उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जरांगे यांना वारंवार का फसवते आणि जरांगे स्वतः का फसतात, याची समीक्षा करण्याची गरज आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध नाही. मात्र हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात. गाड्यांचा ताफा घेऊन ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन केले जात आहे, त्यावरून आपण लोकशाहीत आहोत की राजेशाहीत असा प्रश्न पडतो. सध्या भावनिक साद घालून भावना भडकावून जे चाललाय, त्या आंदोलनाशी ओबीसींचा काही संबंध नाही.

राज्यात सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून धानाचे पीकही करपू लागले आहे. या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विरोधी पक्षनेता असताना फडणवीस पंचनाम्याची वाट न पाहता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करायचे.

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’

मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली असून आता ते सर्व्हेक्षण आणि पडताळणीच्या गप्पा मारत आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, या संकटाच्या काळात केवळ काही नेत्यांनीच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रभर दौरे काढून प्रत्येक जिल्ह्यात सरकारविरोधात तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Congres leader vijay vadettiwar statement about manoj jarange patil and maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!
1

Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
2

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
3

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
4

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.