
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी
NCP Star Campaigner List In Marathi : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘पक्षाकडू स्टार’ प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय लातूरमधील मारहाणीच्या घटनेनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले सूरज चव्हाण आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे देखील स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात पक्षाची बाजू मांडणार आहेत. याशिवाय, पक्षाने अभिनेता सयाजी शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह सर्व मंत्र्यांवर स्टार प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेच्या इतर दोन प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते. त्यावेळी वादग्रस्त विधानांमुळे अजित पवारांनी मिटकरी यांची उचलबांगडी केल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये कटुता निर्माण होते, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होती. त्यामुळेच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना कार्यमुक्त केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.
तसेच, संतोष देशमुख्य हत्याप्रकरणामुळे मंत्रीपद सोडण्याची वेळ आलेले धनंजय मुंडे यांनाही अजित पवार यांनी स्टार प्रचारकपदाची जबाबदारी करून अंशत त्यांचे पुनर्वसन केले आहे. . मंत्रीपद सोडल्यानंतर धनंजय मुंडे पक्षात सक्रिय नव्हते कारण त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नव्हती. एका मध्यावधी कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना ‘माझ्यावर कोणतीही जबाबदारी द्या’, अशी विनंती केली होती. अखेर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला आणि बालविकास अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धरमरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील- चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार सावंत आदी उपस्थित होते. भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सचिव सूरज चव्हाण, लहू कांदे, ओबीसी समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुनील शेळके, माजी आमदार सुनील शेंडे आदी उपस्थित होते. अल्पसंख्याक सेल्चे प्रदेशाध्यक्ष नाजेर काजी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.