Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: ‘अजितदादांच्या निधनाबाबत माझ्याही मनात शंका…’; रोहित पवारांना नेमकं सांगायचंय काय?

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार एका खासगी विमानातून बारामतीकडे निघाले होते. पण बारामती विमानतळावर पोहचताच त्यांचे विमान कोसळले, यात अपघातात अजित पवारांसह चार जणांना दुर्देवी अंत झाला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 10, 2026 | 12:24 PM
Rohit Pawar News: ‘अजितदादांच्या निधनाबाबत माझ्याही मनात शंका…’; रोहित पवारांना नेमकं सांगायचंय काय?
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
  • अमोल मिटकरींकडून घातपाताचा संशय
  • रोहित पवार आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार
Rohit Pawar  on Ajit Pawar plane crash News:  राज्याचे सर्वाधिक लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२८ रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अपघातासंदर्भात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने त्यांच्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. या सगळ्यात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे यांनीदेखील एक फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

Rahul Gandhi : ‘माजी लष्करप्रमुख खोटे बोलत नाहीत’, नरवणे यांच्या पुस्तकावरून राहुल गांधींचा सरकारवर

“बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.” अशा शब्दांत रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे. त्याचवेळी आज सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याबाबत अनेकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार… — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2026

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम, हवामान, आणि उड्डाणापूर्वीच्या काही संशयास्पद घटनांवर भाष्य करू शकतात. रोहित पवारांच्या यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे काही षडयंत्र होते की काही तांत्रिक चूक, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Revati Sule wedding : सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; रेवती सुळे होणार नागपूरच्या सुनबाई

नेमकं काय घडलं २८ जानेवारीला ?

अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार २८ जानेवारीला बारामतीला येत होते. पण बारामती विमानतळावर सकाळी साधारण ८:४५ च्या सुमारास अजित पवार यांचे खाजगी विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत होते. पण लँडिंगच्या वेळी विमान अचानाक जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळताच विमानाचा स्फोट झाला आणि या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, अजित पवार यांच्यासह विमानातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

उपस्थित होणारे प्रश्न आणि संशय

प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी हवामान पूर्णपणे स्वच्छ होते. दृश्यमानता (Visibility) चांगली असतानाही विमान कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हवामान चांगले असताना विमान नेमके कसे कोसळले, याबाबत आता तांत्रिक तज्ज्ञांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेला ‘बॉम्ब’ किंवा ‘स्फोटाचा’ संशय याच पार्श्वभूमीवर आता चर्चेचा विषय ठरत आहे. या भीषण दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

 

Web Title: Rohit pawar news i also have doubts about ajits death what exactly do you want to tell rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Congress
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.