Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला, शिवसेना आमदारांनी युतीधर्म पाळावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

कोकणच्या विधान परिषद उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले असून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असल्याचे समजत आहे. यावरून आता महायुतीत कोकणातील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लग्नल्या आहेत. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 31, 2026 | 06:36 PM
Aniket Tatkare will contest Kokan Vidhanparishad election, Shivsena will cooperate says Eknath Shinde,

Aniket Tatkare will contest Kokan Vidhanparishad election, Shivsena will cooperate says Eknath Shinde,

Follow Us
Close
Follow Us:

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असलेला तिढा आता सुटला आहे. महायुती मध्ये जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कोकणच्या विधान परिषद उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले असून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असल्याचे समजत आहे. यावरून आता महायुतीत कोकणातील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लग्नल्या आहेत. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेनेच्या आमदारांनी युतीधर्म पाळावा.’ अश्या सूचना दिल्या आहेत.

कोकणच्या जागेवरून उद्भवलेल्या वादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा अर्ज दाखल करण्यास शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. कोकणची जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे शिवसेना आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संयम पाळावा अश्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. विधान परिषदेची कोकणातील जागा हि अनिकेत तटकरे हे लढवणार असल्याचे निश्चित झाले असून अनेक दिवसांपासून असलेला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता तरी सुटेल का हे पाहावे लागणार आहे.

या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर असून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पदरात पडून घेण्यास यश मिळाले आहे. यात कोकण विभागाची एक जागा समाविष्ट आहे. म्हणूनच अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरून त्यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. सोमवारी (१ जून) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधीच अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…

पहा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

भाजप – ११ जागा
सोलापूर
जळगाव
भंडारा – गोंदिया
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली
अमरावती
धाराशिव – लातूर – बीड
नागपूर
छत्रपती संभाजीनगर – जालना
अहिल्यानगर
सांगली- सातारा
नांदेड

शिवसेना – ४ जागा
ठाणे
नाशिक
परभणी
यवतमाळ

राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा
कोकण
पुणे

असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.

अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी, अदिती तटकरेंसह उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना

Web Title: Aniket tatkare will contest kokan vidhanparishad election shivsena will cooperate says eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 06:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.