Shivsena Anil parab target bjp mla for doing protest against him
मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अधिवेशन जोरदार गाजते आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे सध्या त्यांच्या विधानामुळे चर्चेमध्ये आले आहे. अनिल परब यांनी त्यांच्या पक्षांतर न करण्याची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली. यामुळे सत्तधारी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांनी आंदोलन देखील केले आहे.
अनिल परब यांनी त्यांचा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकारण रंगले आहे. अनिल परब यांच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर देखील प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांच्यासह इतर आमदारांनी घोषणाबाजी केली. तसेच अनिल परब यांनी माफी मागावी तसेच त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावर आता अनिल परब यांनी विधीमंडळामध्ये उत्तर दिले आहे.
काय म्हणाले अनिल परब?
जोरदार राजकीय टीका झाल्यानंतर अनिल परब यांनी सभागृहामध्ये त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अनिल परब म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज माझे दैवत आहेत. त्यांच्या पायावर डोके ठेवायला मला लाज वाटणार नाही. मी काल जे बोललो, त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. जर मी बोललेलो चुकीचे असेल तर माझे विधान कामकाजातून काढून टाकावे. तसेच मला समज देण्याचा सभापतींचा अधिकार आहे. पण सत्ताधारी बाकावरील आमदार मला समज देणारे कोण?”, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मी काल बोललो की, छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा छळ पक्ष बदलण्यासाठी केला. यात मी काहीच चुकीचे बोललो नाही. तरीदेखील सभापतींना वाटत असेल की, मी चुकीचे बोललो, तर ते विधान कामकाजातून काढून टाकावे,” अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर अनिल परब यांनी भाजपच्या आमदारांनी त्यांच्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवले आहे असा घणाघाती आरोप केला आहे. अनिल परब म्हणाले की, “या सभागृहातील एका आमदाराने आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याने आधी माफी मागावी. प्रशांत कोरकटकर, राहूल सोलापूरकर यांच्यावरून विषय हटविण्यासाठी माझ्याविरोधात आरोप केले जात आहेत.” यानंतर संबंधित आमदाराचे नाव सांगा, असे सांगितले गेल्यानंतर अनिल परब यांनी भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात श्रीकांत भारतीय यांनी आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही टाकली होती, असा उल्लेख अनिल परब यांनी केला. तसेच वाद उद्भवल्यानंतर त्यांनी त्यांनी माफीही मागितली आणि पोस्ट डिलीट केली,” असेही ते म्हणाले.