Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…तर यांची आमदारकी देखील जाईल”; बीड हत्या प्रकरणावरुन अंजली दमानियांनी डागली धनंजय मुंडेंवर तोफ

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी जाईल असा दावा केला आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 24, 2025 | 05:18 PM
Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. मागील दोन महिन्यांपासून न्यायासाठी लढा दिला जात असून अनेक नेत्यांवर यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाला आता दोन महिने होत आले असून यामधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतील आहे.

बीड हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी अनेक धक्कादायक दावे आणि आरोप केले आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करुन पुरावे देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली असून मुंडेंची आमदारकी देखील जाईल, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मास्टर माईंड आरोपी वाल्मीक कराड आणि अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील अर्थिक व्यवहार देखील समोर आणले आहेत. अंजली दमानिया म्हणाल्या की, “आपण ज्या एफआयआरबाबत आपण बोलत होते तो हाच एफआयआर आहे. मी सांगितलं होतं की यावर गंभीर गुन्हे होते. पण चार्जशीटबाबत विचारणा केली तर पुराव्याअभावी नाव वगळली असे सांगण्यात आले, वाल्मिकी आण्णा तिथे नव्हते असं सांगण्यात आले, पुर्ण चौकशी झाली नाही, डीजींकडे पत्र दिले आहे. त्यात ही केस रिओपन करा अशी मागणी आपण केली आहे, ज्याच्यावर हल्ला झाला तोच जेलमध्ये सडत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येत आहे” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “वाल्मिकी कराड याचे नाव वगळण्यात आले आहे. पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आले आहे. काल ऑडीओ क्लिप बाहेर आली आहे. पोलीस अधिकारी बल्लाळ यांचा आवाज असेल तर त्यांची चौकशी व्हावी,सर्व यंत्रणा कराडच्या दिमतीला आहेत असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ३०२ कोणावर लावायचा हे हेच ठरविणार. कुणाला वाचवायचं हे पण तेच ठरविणार. विष्णु चाटे याला चॉईज ऑफ जेल दिले जाते आहे यातच हे सर्व आले,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवर संशय घेतला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “छगन भुजबळ याना तुरूंगात जशी छातीत कळ यायची तशीच आता वाल्मिकी कराडला येत असेल. त्याच्यापोटी मेडीकल ग्राऊंड तयार केला जात आहे. राजकारण्यांना लाज शरम राहीलेली नाही. महाजेनकोतून आर्थिक लाभ धनंजय मुंडे यांनी घेतला आहे, जर कारवाई झाली तर त्यांची आमदारकी रद्द होईल असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. घरकुल योजना, कृषी पंप घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत. ८०० रुपयांचा फरक आहे, कित्येक कोटी कमावले आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.  तृप्ती देसाई काय बोलल्या ? हे मला माहिती नाही पण वाल्मिक कराडचे हात धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहचत असतील तर व्हिडियो कॉन्फरन्सिंग करा, त्याने तोंड ऊघडले तर धनंजय मुंडेंना भोगावं लागेल,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Web Title: Anjali damania claims that if valmik karad speaks dhananjay munde will lose his mla seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Murder
  • Walmik Karad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.