Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्र्यांमध्ये कारवाई न करण्यावरुन स्पर्धा सुरु हे धक्कादायक; अंजली दमानिया महायुतीवर भडकल्या

समाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये गेम खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 30, 2025 | 03:32 PM
anjali damania demands Manikrao Kokate resign Junglee Rummy Legislative Report

anjali damania demands Manikrao Kokate resign Junglee Rummy Legislative Report

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामधील नेत्यांचे वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य तसेच वागणुक यावरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे. महायुतीमधील अनेक सत्ताधारी नेते व मंत्री हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच अजित पवार व मामिकराव कोकाटे यांच्या अर्धा तास झालेल्या भेटीवर देखील त्यांनी टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवारांनी सुरुवातीला असे म्हटले होते की जर शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच आम्ही आमच्या मंत्र्यांवर कारवाई करणार, याला स्पर्धा म्हणावी लागेल. ही धक्कादायक बाब आहे, असा आक्रमक पवित्रा अंजली दमानिया यांनी घेतला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “अजित पवारांनी कोकाटेंना किती वेळा माफ करणार? असे म्हटल्याचे ऐकलं आहे. माणिकराव कोकाटेंनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागितली आहे, असे सांगितले. यात आपल्याला थेट कारवाई कुठेही झालेली दिसत नाही. एकदा ओसाड गावची पाटील की म्हणजे कृषिमंत्री पद हे म्हणणं तिथेच खरं तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. पण एकदा नाही अनेक वेळा विमा वरुन म्हणा, शेतकऱ्यांना मारलेले टोमणे म्हणा किंवा ओसाड गावची पाटील की म्हणा इतकी विधान करून सुद्धा कारवाई झाली नाही. आता तर थेट पत्ते खेळताना जेव्हा दिसतात, तरी जर कारवाई झाली नाही तर दुर्दैवी आहे,” असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वीट करुन माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या की, “अधिवेशनात काय करत होते, कोणी आरोप काय केले? मला त्याच्यात नाही पडायचे. आपल्याला दिसतंय की त्या अधिवेशनात पत्ते खेळत होते. एका मंत्र्याकडूनही अपेक्षा नक्कीच नसते. लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही तिथे अधिवेशनात जातात. हे जर तुम्ही कृत्य केलं, तर ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे,” असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले. अंजली दमानिया यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळत आहे.

Web Title: Anjali damania demands manikrao kokate resign junglee rummy legislative report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • anjali damania
  • Manikrao Kokate
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.