भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उपराष्ट्रपती निवडणूक 2025 वरुन खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विशेष चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिले. तसेच टीकांवर जोरदार घणाघात देखील केला. पंतप्रधान मोदी यांच्या संसदेमधील भाषणावरुन आता राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे रडगाणं असल्याचे म्हणत टीका केली आहे.
ट्रम्प यांचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते?
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेमध्ये भाषण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर संदर्भात नरेंद्र मोदी यांचं कालच भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायच म्हणजे रुदाली रडगाणं होतं. भाषणं काल कोणाची झाली. तुम्ही राहुल गांधी, प्रियकां गांधींच भाषण ऐका. राज्यसभेत खर्गेनी मुद्दे मांडले, त्याचं उत्तर आहे का? विरोधी पक्षाने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांच उत्तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे नव्हतं. खोट बोलत आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डोनाल्ड ट्रम्प आणि चीनच नाव घेतलं नाही. मोदी म्हणत होते, माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. माझी कोणाशी चर्चा झाली नाही. काल मोदीचं भाषण संपल्यावर ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं. पण ट्रम्प यांचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते? असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मात्र त्यांचा राजीनामा घेण्यात न आल्यामुळे टीका केली जात आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात नवीन कायदा आला आहे. फडणवीस Act. समज द्या आणि सोडून द्या. काही मंत्र्यांना काल समज दिली आणि सोडून दिलं. हा फडणवीस Act आहे,” अशी टीका खासदार राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हा नवीन फडणवीस Act
त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये गेम खेळली नसल्याचा दावा केला आहे. मात्र विधीमंडळाच्या अहवालामधून कोकाटे हे 20 मिनिटे गेम खेळत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात? किंवा विधानसभा अध्यक्ष किती किंमत देतात? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. फडणवीस घोषणा करतात. कारवाईचं पुढे काय होतं?. अंदाज समितीचा अध्यक्ष लाचखोर आहे हे उघड झालं. त्याला वाचवताय. हा नवीन फडणवीस Act आलेला आहे. आपल्या लोकांना वाचवायचं बाकीच्यांना तुरुंगात टाकायचं,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.