Anjali Damania on Union Minister BJP Nitin Gadkari fraud allegations Political News
Anjali Damania On Nitin Gadkari Fraud मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी संतोष हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांना धारेवर धरले होते. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या रडारवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते असलेल्या नितीन गडकरी यांची राजकीय प्रतिमा ही अतिशय स्वच्छ आहे. संपूर्ण देशामध्ये आज त्यांची चांगली प्रतिमा आणि कामाप्रती असलेली निष्ठा यावरुन त्यांचे कौतुक केले जाते. मात्र अंजली दमानिया यांनी आत नितीन गडकरी यांच्यावर आरोप करत घोटाळे बाहेर काढणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक हे खाते सांभाळतात. मोदी सरकारमध्ये त्यांनी कार्य केलेल्या या खात्याची ख्याती सर्व देशामध्ये पसरली आहे. संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचे जाळे सुधारित करण्यामध्ये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. अगदी त्यांचे रोडकरी म्हणून सुद्धा कौतुक केले जाते. दरम्यान, याच विभागामध्ये काम करताना नितीन गडकरी यांनी अनेक उलथापालथ केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांनी पैशांची अफरातफर केली असल्याचा अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. अंजली दमानिया म्हणाल्या की, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांनी अफरातफर करत जनतेची अर्थिक फसवणूक केली आहे. प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात टोलच्या माध्यमातून मिळवलेले पैसे हे स्वतःच्या मुलांच्या कंपनीमध्ये वळवले गेले आहेत,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
हा सर्व मनी लाँडरिंगचा प्रकार
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधून नितीन गडकरींवर गंभीर आरोप केले आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, “मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना कुठलाही आर्थिक फायदा मिळवून देणे, हा कायदेशीर गुन्हा असूनही गडकरी यांच्याकडून तो सातत्याने होत आहे. स्ते आणि टोलच्या माध्यमातून मिळालेला पैसा आयडीयल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीत जमा करण्यात आला. याच कंपनीतून हा पैसा कंपन्यांचे जाळे उभे करून आणि यंत्रणांच्या मदतीने नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीत पाठवला गेला. हा सर्व प्रकार मनी लाँडरिंगचा आहे. चौकशी केल्यास यात नक्कीच शिक्षा होईल,” अशी गंभीर टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉल संदर्भातही दमानिया यांनी गंभीर आरोप केले. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. अशा १०८ कंपन्यांचे तपशील आहेत आणि या कंपन्यांची माहिती उघड केल्यास वर्षभर पुरेल, असे देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. यावरुन आता राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये मोठा भुकंप होण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे यावर गडकरी काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.