भाजपसह जेडीयू, राजदची डोकेदुखी आणखी वाढणार? नवा पक्ष बिहारच्या राजकारणात
नवी दिल्ली : बिहारमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी केल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी राजकीय कमबॅक केले आहे आणि त्यांनी ‘जनशक्ती जनता दल’ या त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देखील उघड केले आहे.
पक्षाचे निवडणूक चिन्ह ब्लॅकबोर्ड आहे. पोस्टरमध्ये तेज प्रताप यांचा फोटो आहे आणि त्यात लिहिले आहे की, ‘सामाजिक न्याय, सामाजिक हक और संपूर्ण बदलाव. जन-जन की शक्ति, जन-जन का राज, बिहार का विकास करेंगे तेज प्रताप’. तेज प्रताप यांनी त्यांच्या पक्षात सामील होण्यासाठी एक संपर्क मोबाईल नंबर देखील शेअर केला. त्यांनी त्यांचा पक्ष बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये संपूर्ण बदल घडवून आणणे आणि एक नवीन व्यवस्था निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे आणि यासाठी ते दीर्घ राजकीय लढाई लढण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हमलोग बिहार के संपूर्ण विकास के लिए पूर्ण रूप से समर्पित और तत्पर हैं। हमारा मकसद बिहार में संपूर्ण बदलाव कर एक नई व्यवस्था का नव निर्माण करना है। हमलोग बिहार के संपूर्ण विकास के लिए लंबी लड़ाई लड़ने को तैयार हैं।#tejpratapyadav #janshaktijantadal #biharelection pic.twitter.com/GxsQHw0WqQ — Tej Pratap Yadav (@TejYadav14) September 25, 2025
तेज प्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलापासून राजकीय प्रवास सुरू केला. महाआघाडी सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले. अलीकडेच एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांनी त्यांचे नाते उघडात आणले होते. नंतर त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आल्याचे म्हटले होते.
हेदेखील वाचा : Bihar Politics : ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपने धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
तेजस्वी यादव यांच्याशी मतभेद
तेज प्रताप यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत. त्यांचे धाकटे भाऊ तेजस्वी यादव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे ते वारंवार चर्चेत आले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला तेज प्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पाच लहान पक्षांसोबत युती करण्याची घोषणा केली. त्यांचे वडील आणि पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलातून काढून टाकल्यानंतर काही महिन्यांनीच त्यांनी युतीचा निर्णय घेतला.